AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप, फ्लॉप करियर… भारताच्या मिस वर्ल्डला आता ओळखणं कठीण

मिस वर्ल्ड ठरल्यानंतर मॉडेलचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं... सिनेमांमध्ये विजेत्यांना संधी मिळते आणि त्यांची स्वतःची एक नवीन ओळख निर्माण होते... भारताच्या एका मिस वर्ल्डच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यात अनेक अडचणी आल्या.. 'त्या' मिस वर्ल्डला आता ओळखणं देखील झालंय कठीण...

पतीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप, फ्लॉप करियर... भारताच्या मिस वर्ल्डला आता ओळखणं कठीण
| Updated on: Mar 11, 2024 | 9:09 AM
Share

मुंबई | 11 मार्च 2024 : नुकताच मुंबईतील जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड 2024 चा फिनाले मोठ्या थाटात पार पडला. चेक रिपब्लिकच्या क्रिस्टीना पिजकोव्हा हिने मिस वर्ल्डचा किताब स्वतःच्या नावावर केला आहे, तर लेबनॉनची यास्मिना जायतौन ही या स्पर्धेत पहिली उपविजेती ठरली. तर भारताच्या सिनी शेट्टी हिला हार स्वीकारावी लागली. सांगायचं झालं तर, मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेसाठी अनेक सेलिब्रिटींनी जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये हजेरी लावली होती. भारताच्या माजी मिस वर्ल्ड देखील जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये उपस्थित होत्या.

1999 मध्ये मिस वर्ल्डचा किताब स्वतःच्या नावावर करणारी युक्ता मुखी देखील मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेसाठी उपस्थित होती. अनेक वर्षांनंतर युक्ताला पाहिल्यानंतर, तिला ओळखणं देखील कठीण झालं होते. सध्या युक्ताचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात तिला पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला…

View this post on Instagram

A post shared by $@M (@samthebestest_)

युक्ता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर अभिनेत्री म्हणून युक्ताने तिच्या करियरची सुरुवात केली. पण अभिनय विश्वात युक्ताला स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. त्यानंतर युक्ताने न्यूयॉर्क येथील उद्योजक आणि फायनेंशियल कंसल्टेंस प्रिंस तुली यांच्यासोबत 2008 मध्ये लग्न केलं.

युक्ताने प्रिंस तुली यांच्यासोबत लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2013 मध्ये युक्ता आणि प्रिंस याचा घटस्फोट झाला. दोघांना एक मुलगी देखील आहे. युक्ताने पतीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. अभिनेत्रीने पती विरोधात गुन्हा देखील दाखल केला होता.

भारताच्या आतापर्यंतच्या मिस वर्ल्ड

भारताने आतापर्यंत 6 वेळा मिस वर्ल्डचा किताब जिंकला आहे. भारताच्या पहिल्या मिस वर्ल्ड रिता फरिया होत्या… त्यांनी 1966 मध्ये पहिला मिस वर्ल्डचा ताज स्वतःच्या डोक्यावर घातला… त्यानंतर 1994 मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मिस वर्ल्ड म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यानंतर 1997 मध्ये डायना हेडन आणि 1999 मध्ये युक्ता मुखी हिने मिस वर्ल्डचा किताब जिंकला…

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने 2000 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला. आज प्रियांकाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आता अभिनेत्री अमेरिकेत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. जगातील सर्वात लोकप्रिय महिला म्हणून देखील प्रियांकाची ओळख आहे.

प्रियांका चोप्रा हिच्यानंतर 2017 मध्ये मानुषी छिल्लर हिने मिस वर्ल्डचा किताब जिंकला. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर मानुषीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

Follow Us
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या...
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट!
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला..
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला रामराम!
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प