
Actress Life: अभिनेत्रींच्या आयुष्यात कायम चढ-उतार येत असतात. कधी खासगी आयुष्यात तर कधी प्रोफेशनल आयुष्यात… अशात अभिनेत्रींचं मनोबळ खचतं आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत असं झालं आहे. आता सध्या अशा एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, जीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण काही काळानंतर अभिनेत्रीवर वेश्याव्यवसायासारखे गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतर एका मुलाखतीच्या माध्यमातून अभिनेत्रीने यावर स्पष्टीकरण दिलं…
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री दिप्ती नवल आहे… दिप्ती हिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान पक्क केलं… पण एक वेळ अशी देखील आली, जेव्हा दिप्ती हिला घरातून बाहेर पडणं देखील कठीण झालं होतं. काहीच चुकीनसून अभिनेत्रीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.
सर्वात आधी दिप्ती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचं बालपण अमेरिकेत गेलं… तिचे वडील न्यूयॉर्कमध्ये प्रोफेसर होते. दिप्ती हिने मोठं झाल्यानंतर चित्रकार व्हावं अशी वडिलांची इच्छा होती… पण दिप्ती हिचं स्वप्न वडिलांच्या इच्छेपेक्षा फार वेगळं होतं… दिप्ती हिने प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री व्हायचं होतं… दिप्ती हिने वडिलांच्या विरोधात जात स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं.
पण इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्यानंतर दिप्तीच्या आयुष्यात काळा दिवस येईल याचा तिने विचार देखील केला नव्हता… तेव्हा एका झटक्यात अभिनेत्रीचं करीयर देखील उद्ध्वस्त झालं. एका मुलाखतीत दिप्ती म्हणाली, अभिनेत्री एक फ्लॅट घेतला होता. ज्यामध्ये ती कायम तिच्या मित्र परिवारासह पार्टी करायची… त्या काळी फ्लॅट घेणं लोकांसाठी फार मोठी गोष्ट होती…
मित्रांव्यतिरिक्त, मीडिया प्रतिनिधी आणि चित्रपटांशी संबंधित लोक देखील पार्टीला येत असत. अशा परिस्थितीत, काही लोकांना वाटलं, मी वेश्याव्यवसायात सामील आहे आणि त्यांनी माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली. त्यावेळी माझं मनोबल खचलं आणि मी घराबाहेर निघणं देखील बंद केलं होतं… पसरलेल्या अफवांमुळे मला सिनेमांमध्ये काम मिळणं देखील बंद झालं होतं… असं देखील अभिनेत्री म्हणाली.