AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nikki Murder Case प्रकरणी माजी लेफ्टनंट संतापल्या, म्हणाल्या, ‘लाज वाटली पाहिजे अशा आई – वडिलांना जे…’

Nikki Murder Case: 'लाज वाटली पाहिजे अशा आई - वडिलांना जे...', हुंड्यासाठी सासरच्यांनी निक्कीचे घेतले प्राण, माजी लेफ्टनंट यांनी संतापात केलं मोठं वक्तव्य, निक्की मर्डर केसमुळे माजली आहे सर्वत्र खळबळ

Nikki Murder Case प्रकरणी माजी लेफ्टनंट संतापल्या, म्हणाल्या, 'लाज वाटली पाहिजे अशा आई - वडिलांना जे...'
फाईल फोटो
| Updated on: Aug 25, 2025 | 11:52 AM
Share

Nikki Murder Case: वैष्णवी हगवने नंतर आता निक्की मर्डर प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली आहे. हुंड्याच्या छळामुळे ग्रेटर नोएडामध्ये निक्कीला तिचा पती विपिन आणि सासरच्या लोकांनी जाळून मारल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. अनेकांना निक्ती प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. आता अभिनेत्री दिशा पटानी हिची बहीण आणि माजी लेफ्टनंट खुशबू पटानी यांनी स्वतःचं परखड मत तयार केलं आहे. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

खुशबू पटानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट रोजी निक्की हत्याकांड उघडकीस आलं. ज्यामध्ये ग्रेटर नोएडा येथील रहिवासी विपिनने त्याच्या आई आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह हुंडा मागणीवरून झालेल्या वादानंतर पत्नी निक्कीची हत्या केली.

सध्या याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत असून खुशबू पटानी यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ‘महिलांविरोधात होणारे अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीत. मनीषाच्या अग्निची आग अजून शांत झालेली नाही आणि आता निक्की हत्याकांडाचा विषय समोर आला आहे. हैराण करणारी मोठी गोष्ट म्हणजे स्त्रीच स्त्रीची शत्रू झाली आहे. जुन्या काळापासून फक्त महिलांचं शोषण होत आहे…’

‘आता महिलांनी समाजाचा चिंता करणं सोडलं पाहिजे आणि स्वतःच्या संरक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे… आता चारित्र्यावर शिकवण देण थांबवा आणि स्वतःसाठी लढायला शिका. कारण तुम्हालाच स्वतःचं रक्षण करावं लागणार आहे. ‘

याशिवाय पोस्टमध्ये खुशबू पटानी म्हणाल्या, मनीषा हिच्यानंतर आणि आता निक्की… चारित्र्याचे पुरावे देणारे आता कुठे गेले? निक्कीने कधी विचार देखील केला नसेल की तिच्यासोबत असं काही होईल… हा आहे आमचा आदर, आमच्या मुलींचा अधिकार, लाज वाटली पाहिजे अशा आई – वडिलांना जे हुंडा घेतात आणि जे हुंडा देतात… कायद्याने गुन्हा असला तरी हा धंधा मोठ्या जोरात सुरु आहे…

महिलांच्या चारित्र्यावर भाष्य करणारे सैतान आणि त्यांचे नेते सर्वत्र आहेत, पण आज ते गायब आहेत. आशा आहे की प्रशासन अशा सैतानांवर कठोर कारवाई करेल… जागो भारत जागो…, असं देखील खुशबू पटानी म्हणाल्या आहेत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा