AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही अभिनेत्री कधीकाळी हॉटेलमध्ये करत होती काम, आज ठरली सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री, एका एपिसोडची फी पाहून…

मनोरंजनसृष्टीतील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री, जी कधीकाळी घर चालवण्यासाठी करत होती हॉटेलमध्ये काम. आज एका एपिसोडसाठी घेते 3 ते 3.5 लाख रुपये.

ही अभिनेत्री कधीकाळी हॉटेलमध्ये करत होती काम, आज ठरली सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री, एका एपिसोडची फी पाहून...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 29, 2026 | 12:26 PM
Share

मनोरंजनसृष्टीत अनेक कलाकारांचे आयुष्य बदलले असले तरी या चमकदार दुनियेच्या मागे मोठा संघर्ष दडलेला असतो. अशाच एका अभिनेत्रीची प्रेरणादायी कहाणी सध्या चर्चेत आहे. आपण ज्यांच्याबद्दल बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे लोकप्रिय टीव्ही मालिका अनुपमा मधील मुख्य अभिनेत्री रुपाली गांगुली.

रुपाली गांगुली ही दिग्दर्शक अनिल गांगुली यांची मुलगी आहेत. तिने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात खूप कठीण परिस्थितीचा सामना केला. एका मुलाखतीत रुपालीने सांगितले की, तिच्या वडिलांचे दोन चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती खूपच बिकट झाली होती. त्या काळात घर चालवण्यासाठी रुपालीला हॉटेलमध्ये काम करावे लागले, कधी बुटीकमध्ये काम केले तर कधी केटरिंगसारखी कामेही केली.

नंतर तिने पृथ्वी थिएटर येथे काम करण्यास सुरुवात केली. तिथे तिने दिनेश ठाकुर यांच्या ‘आत्मकथा’ या नाटकात भूमिका साकारली. या पहिल्या नाटकासाठी तिला फक्त 50 रुपये मानधन मिळाले होते.

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक

चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर रुपालीने टीव्हीकडे वळण्याचा निर्णय घेतला. साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत ‘मोनिशा’ची भूमिका साकारत तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली. मात्र त्यानंतर काही काळ तिला मोठे प्रोजेक्ट्स मिळाले नाहीत.

यानंतर 2020 साली राजन शाही यांच्या अनुपमा या मालिकेने तिच्या करिअरला नवे वळण दिले. मध्यमवर्गीय स्त्रीची भूमिका साकारणाऱ्या ‘अनुपमा’मुळे रुपाली घराघरात पोहोचल्या. गेल्या सहा वर्षांपासून ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर आहे आणि त्यामुळे रुपाली गांगुली आज टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे.

टीआरपीनंतप मानधनात वाढ

अहवालानुसार, रुपाली गांगुली सध्या एका एपिसोडसाठी सुमारे 3 ते 3.5 लाख रुपये मानधन घेते. मालिकेच्या सुरुवातीला तिला प्रति एपिसोड सुमारे 1.5 लाख रुपये मिळत होते. मात्र मालिकेच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि सातत्याने उच्च टीआरपीमुळे तिच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली. दरम्यान, संघर्षातून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेली रुपाली गांगुलीची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Follow Us
107 वर्ष जुन्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळासोबत अदाणी ग्रुपचं...
107 वर्ष जुन्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळासोबत अदाणी ग्रुपचं टायअप, यंदाचा गणेशोत्सव...
पुणे-सातारा महामार्ग रास्तारोको: सुप्रिया सुळेंचा आंदोलकांशी संवाद,
पुणे-सातारा महामार्ग रास्तारोको: सुप्रिया सुळेंचा आंदोलकांशी संवाद, प्रमुख तीन मागण्या काय?
मंत्र्याच्या जावयाला... भ्रष्टाचाराचं 'जामनेर पॅटर्न'; नाशिकसह महाराष्
मंत्र्याच्या जावयाला... भ्रष्टाचाराचं 'जामनेर पॅटर्न'; नाशिकसह महाराष्ट्रभरात... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
शिंदे गटाची इनकमिंग काही थांबेना! ठाकरे गटाला मोठा धक्का, धाराशिव...
शिंदे गटाची इनकमिंग काही थांबेना! ठाकरे गटाला दिला आणखी मोठा धक्का, धाराशिवच्या राजकारणात...
कुणालच्या घरी गरिबी नाही भरपूर पैसा, मात्र बापानं... अखेर कपरे भरवणारी
कुणालच्या घरी गरिबी नाही भरपूर पैसा, मात्र बापानं... अखेर थरकाप उडवणारी माहिती समोर
मोठी बातमी! रोहित पवारांच्या PA च्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, आईशीच..
मोठी बातमी! रोहित पवारांच्या PA च्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, आईशीच... हादरवणारी माहिती समोर
कुटुंबातील एकही व्यक्ती... कुणालच्या शेजाऱ्यांनीची चक्रावणारी माहिती
खवड्या डोंगर: कुटुंबातील एकही व्यक्ती... कुणालच्या शेजाऱ्यांनी दिली चक्रावणारी माहिती, अखेरच्या चार महिन्यांमध्ये...
मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर गंभीर गुन्हा दाखल, थेट शासकीय...
मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर गंभीर गुन्हा दाखल, थेट शासकीय... नेमकं काय घडलं?
भुलेश्वरमधील गणेश मुर्ती अपघात प्रकरणी खळबळ जनक माहिती समोर, अचानक...
भुलेश्वरमधील गणेश मुर्ती अपघात प्रकरणी खळबळ जनक माहिती समोर, अचानक मुर्तीचा...
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप