
अभिनेता रणबीर कपूरचा काल ( रविवार , 28 सप्टेंबर) वाढदिवस होता. चॉकलेट हिरो रणबीर आता 43 वर्षांचा झाला असून, त्याने या निमित्ताने कुटुंबिय, मित्र-मैत्रिणींसोबत शानदार सेलिब्रेशन केलं. चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देत अभिनंदन केलं. रणबीर कपूरच्या सर्व चाहत्यांनी त्याला भेटवस्तू पाठवल्या आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याच निमित्ताने पापाराझीही रणबीरला विश करण्यासाठी, फोटो काढण्यासाठी याच्या घरी पोहोचले. पण तेव्हाच तिकडे असं काही झालं ज्याची कोणीच कल्पनाही केली नव्हती. वाढदिवसाच्या दिवशीच रणबीर अचानक खूप भडकला आणि त्याचा कोपिष्ट अवतार पहायला मिळाला. घरी आलेल्या लोकांनाच त्याने ढकलून बाहेर काढलं.
रणबीरचा व्हिडीओ व्हायरल
बर्थडे बॉय रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आह, ज्यामध्ये रणबीर कपूर त्याच्या घराच्या गेटजवळ जाताना दिसला. पण तिथे जाऊन तो ओरडू लागला, तिथले फोटोग्राफर्स, पापाराझींवर भडकून तो चिडताना दिसला. ” यार माझ्या बिल्डींगमधले तक्रार करतील, हे बिल्डींगमध्ये अलाऊ करत नाहीत यार ” असं तो म्हणाला. तरीही पापाराझींनी त्याच्याकडे फोटोची मागणी सुरूच ठेवली. शेवटी तो बोलला ” 12 वाजतील आता” , हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून चांगलाच चर्चेत आहे.
पापाराझींना घराबाहेर काढलं
त्यानंतर पापाराझींनी रणबीरला इमारतीच्या बाहेर येऊन फोटो काढण्याची विनंती केली, त्यानंतर रणबीरने त्यांना मुख्य गेट उघडण्यास सांगितले. त्या संध्याकाळी, पापाराझींना शांत करण्यासाठी, अभिनेत्याने त्यांच्यासोबत त्याचा वाढदिवस साजरा केला आणि केक कापला.
रविवारी रणबीर हाँ त्याच्या लाइफस्टाइल ब्रँड, आर्क्सच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लाईव्ह आला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला, “खूप छान गेला दिवस. मी संपूर्ण दिवस आलिया आणि रियासोबत घालवला. बाकी फार कही केलं नाही… राहाने मला प्रॉमिस केलं होती की ती मला 43 किस देईल आणि तिने ते दिलंही.एवढंच नव्हे तर तिने माझ्यासाठी एक सुंदर कार्डही बनवलं, ते पाहून मी खूपच भावूक झालो. आजचा बर्थडे एकदम परफेक्ट होता” अशा शब्दांत रणबीरने त्याच्या भावना व्यक्त केला.
रणबीर लवकरच रामायण चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसेल.