
मुंबई : शर्लिन चोप्रा हे नाव गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असलेले एक नाव आहे. साजिद खान बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यानंतर शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिचा पारा चांगलाच चढल्याचे दिसले. इतकेच नाही तर या विरोधात शर्लिन चोप्रा हिने थेट पोलिसांमध्ये धाव घेतली होती. शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत (Rakhi Sawant) यांच्यामधील वाद तर सर्वांनाच माहिती आहे. शर्लिन चोप्रा हिने बिग बाॅसच्या (Bigg Boss) निर्मात्यांना देखील नोटीस पाठवली होती, साजिद खान याला घरात दाखल करून घेतल्याबद्दल. विशेष म्हणजे शर्लिन चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. शर्लिन चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोठे भाष्य केले होते.
शर्लिन चोप्रा हिने सांगितले होते की, एक मोठ्या राजकारणी व्यक्तीच्या मुलासोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. त्याला माझ्यावर प्रेम नव्हते फक्त काही गोष्टींसाठी तो प्रेमाचे नाटक करत असल्याचे देखील शर्लिन चोप्रा हिने म्हटले. पुढे शर्लिन चोप्रा म्हणाली की, तो आता त्याच्या वडिलांची जागा हळूहळू घेत असून तो मोठा नेता आता बनला आहे.
नुकताच शर्लिन चोप्रा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. शर्लिन चोप्रा हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का हा बसलाय. कारण या व्हिडीओमध्ये शर्लिन चोप्रा ही चक्क राहुल गांधी याच्यासोबत लग्नावर भाष्य करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण हे हैराण झाल्याचे देखील बघायला मिळत आहेत.
व्हिडीओमध्ये एकजण शर्लिन चोप्रा हिला विचारतो की, तू राहुल गांधी याच्यासोबत लग्न करणार का? यावर उत्तर देताना शर्लिन चोप्रा म्हणाली की, हो…का नाही…मला राहुल गांधी याच्यासोबत लग्न करायचा नक्कीच आवडेल. मात्र, त्यापूर्वी माझी एक अट असणार आहे. मी लग्नानंतर माझे आडनाव अजिबात बदलणार नाही.
आता शर्लिन चोप्रा हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओनंतर शर्लिन चोप्रा हिची खिल्ली उडवल्याचे देखील दिसत आहे. शर्लिन चोप्रा हिच्या या व्हिडीओ कमेंट करत अनेकांनी म्हटले आहे की, राहुल गांधी याने आयुष्यभर लग्न केले नाही तरी चालेल परंतू हिच्यासोबत लग्न अजिबात नाही.