
kajol : बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी ती कोणत्याही व्हिडीओमुळे नाही तिच्या एका चित्रपटातील फोटोमुळे चर्चेत आली आहे. 1997 साली प्रदर्शित झालेला आमिर खान, अजय देवगन, जूही चावला आणि काजोल यांचा मल्टी-स्टारर चित्रपट ‘इश्क’ त्या काळातील सर्वात मोठ्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. रोमँटिक कॉमेडीचा दर्जा मिळवलेल्या या चित्रपटातील अनेक सीन आणि संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मात्र, या चित्रपटात काजोलसोबत झळकलेली एक गोंडस, गुलाबी ड्रेसमधील मुलगी तुम्हाला आठवते का?
त्या मासूम चेहऱ्याला कदाचित अनेकजण विसरले असतील पण आज तीच चिमुरडी बॉलिवूडमधील एक हुशार आणि लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. आपण बोलत आहोत फातिमा सना शेख हिच्याबद्दल. जिने ‘दंगल’ चित्रपटात गीता फोगाटची भूमिका साकारत संपूर्ण देशभरात आपली ओळख निर्माण केली.
‘गुस्ताख इश्क’च्या स्क्रीनिंगमध्ये लक्ष वेधून घेतलं
अलीकडेच फातिमा सना शेखचा ‘गुस्ताख इश्क’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान फातिमा पांढऱ्या साडीत उपस्थित राहिली होती. तिचा सोज्वळ आणि देखणा लूक पाहता ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. या खास प्रसंगी अभिनेत्री काजोल देखील तिथे उपस्थित होती आणि दोघींनी एकत्र कॅमेऱ्यासाठी पोझ दिल्या.
हा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रेक्षकांना लगेचच ‘इश्क’ चित्रपटातील तो जुना सीन आठवला, ज्यामध्ये काजोल फातिमाला प्रेमाने गोदेत उचलून धरलेली दिसतेय. 27 वर्षांनंतर दोघींना एकत्रित पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर प्रचंड भावूक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
आमिर खानसोबतचा जुना किस्सा
अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत फातिमाने एक रंजक आठवण शेअर केली. तिने सांगितले की ‘दंगल’ चित्रपटापूर्वीही तिने आमिर खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. फातिमा म्हणाली, खूप वर्षांपूर्वी ‘इश्क’ चित्रपटात एक सीन आहे, जिथे आमिर ‘मरा-मरा’ करत येतो आणि समोर काजोलच्या हातात एक लहान मुलगी असते… ती मुलगी म्हणजे मीच आहे.’ असं तिने सांगितलं.