Disha Patani – Tiger Shorff यांच्या नात्याला नवं वळण? जुना फोटो पोस्ट करत अभिनेता म्हणाला…
ब्रेकअपच्या अनेक वर्षांनंतर दिशा आणि टायगर यांच्या नात्याला मिळालं नवं वळण... अभिनेत्याने पोस्ट केलेला जुना फोटो पाहिल्यानंतर व्हाल हैराण

मुंबई | एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या नात्याची चर्चा सुरु होती. पण काही वर्षांपूर्वी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी तुफान जोर धरला. दोघ्यांच्या ब्रेकअपनंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. त्यानंतर दोघे कधी एकत्र दिसले देखील नाही. पण आता टायगरने दोघांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. सध्या सर्वत्र टायगरने पोस्टे केलेल्या फोटोची चर्चा आहे. अभिनेत्याने दिशा हिच्यासोबत फोटो पोस्ट करण्यामागे देखील एक कारण आहे. अभिनेत्री दिशाचा वाढदिवस असल्यामुळे टायगरने एक्स – गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोटो पोस्ट केला आहे. अभिनेत्याने फक्त फोटो पोस्ट केला नसून खास संदेश देखील लिहिला आहे.
दिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अभिनेता म्हणाला, ‘येणारा काळ हा आनंददायी असेल… असं कायम प्रेम आणि आनंद सर्वांसोबत वाटत राहा… वाढदिवसाच्या शुभेच्छा @dishapatani’… टायगरने इन्स्टाग्राम स्टोरीवर दिशासोबत असलेला एक जुना फोटो पोस्ट करत अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, जेव्हा दिशा आणि टायगर यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला, तेव्हा अभिनेता जॉकी श्रॉफ यांना दोघांच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं होतं. . टायगर श्रॉफच्या यांनी मुलाच्या ब्रेकअपच्या प्रतिक्रिया देताना म्हणाले, दिशा-टायगर नेहमीच मित्र होते आणि अजूनही आहेत. मी त्यांना एकत्र हँग आउट करताना पाहिले आहे. मी मुलांच्या प्रयव्हसीमध्ये जास्त पडत नाही, पण मला वाटते की ते चांगले मित्र आहेत. कामाव्यतिरिक्त ते एकमेकांसोबत वेळ घालवतात…
सांगायचं झालं तर, टायगर याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा एका नव्या तरुणासोबत अनेकदा दिसली. अलेक्जेंडर एलेक्स इलिक असे त्या व्यक्तीचे नाव आहे. तो फक्त फिटनेस फ्रीक नसून तो एक मॉडल पण आहे. दिशा आणि हा व्यक्ती नेहमीचसोबत स्पॉ होतात. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला…
दिशा पटानी हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज अभिनेत्री तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील दिशाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर वर्कआऊटचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांना फिट राहण्यासाठी आवाहन करत असते..
सोशल मीडियावर देखील दिशाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी देखील अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते…
