Tiger Shroff | टायगर श्रॉफची नव्या ‘दिशेने’ वाटचाल ? कोण आहे ही मिस्ट्री गर्ल ?
Tiger Shroff : टायगर श्रॉफची पर्सनल लाइफ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याच्या नव्या गर्लफ्रेंडचे नाव दिशा पटाणीशी मिळतंजुळतं आहे.

मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या त्याच्या नव्या चित्रपटामुळे किंवा प्रोजेक्टमुळे नव्हे तर डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षी टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणीच्या (Disha Patani) ब्रेकअपच्या चर्चेमुळे त्यांचे चाहते निराश झाले होते. दोघंही एकमेकांना सहा वर्ष डेट करत होते. पण ते याबद्दल कधीच उघडपणे बोलले नाहीत.
त्यानंतर टायगरचे नाव अभिनेत्री आकांक्षा शर्मासोबत जोडले गेले होते. पण आता टायगरच्या आयुष्याची नव्या ‘दिशेने’ वाटचाल सुरू झाली असून त्याच्या नव्या गर्लफ्रेंडचे नाव दिशा पटाणीशी बरंच मिळतं-जुळतं असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, टायगर सध्या अभिनेत्री दीशा धानुका (Deesha Dhanuka) हिला डेट करत आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते समजून घेऊया.
View this post on Instagram
दिशा पटाणीशी ब्रेकअप झाल्यावर साधारण एका वर्षानंतर टायगरच्या आयुष्यात पुन्हा नवं प्रेम आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टायगर सध्या दीशा धानुका हिला डेट करत आहे. दोघेही साधारण एक वर्षाहून अधिक कालावधीपासून एकत्र आहेत, पण त्याबद्दल कोणालाच माहीत नाही. एका वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार, दीशा धानुका आणि टायगर गेल्या जुलैपासून एकत्र आहेत. त्यापूर्वीच टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणी यांचं नातं संपलं होतं.
गेल्या वर्षी करण जोहरच्या (कॉफी विथ करण) चॅट शोमध्ये टायगरने तो सिंगल असल्याचा दावा केला होता. मात्र त्यानंतर त्याचं नाव आणखी एका अभिनेत्रीशी जोडलं गेलं होते. दिशाशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात अभिनेत्री आकांक्षा शर्मा हिची एंट्री झाल्याची चर्चा सुरू होती. ते दोघेही एकमेकांना डेट करत होते, असेही बोलले जात होते. तर काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, टायगर आणि आकांक्षा शर्मा यांच्यातील जवळीक वाढल्याने दिशासोबत ब्रेकअप झाल्याचं म्हटलं गेलं होतं.
