AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff : गोळीबारानंतर टायगर श्रॉफच्या टीमचं पहिलं निवेदन, दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

Tiger Shroff Team Statement : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला, त्यानंतर आता अभिनेत्याच्या टीमनं अधिकृत निवेदन जरी केलं असून चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर अधिकृत कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

Tiger Shroff : गोळीबारानंतर टायगर श्रॉफच्या टीमचं पहिलं निवेदन, दिला कायदेशीर कारवाईचा इशारा
| Updated on: Oct 20, 2026 | 9:01 PM
Share

१८ ऑक्टोबर रोजी अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला असून अभिनेता सुरक्षित आहे. तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईनं आपल्या साथीदारांमार्फत अभिनेत्यावर हा हल्ला घडवून आणला होता, असं सांगितलं गेलं. पण, अभिनेता टार्गेट नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. मुंबईतील चित्रपट कलाकारांची सुरक्षा प्रशासनासाठी एक मोठा प्रश्न बनली आहे. दरम्यान, टायगरबद्दल अनेक खोटी विधानं आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्याच्या टीमनं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

टायगरच्या टीमची प्रतिक्रिया

गोळीबारानंतर टायगर श्रॉफच्या टीमनं एक अधिकृत निवेदन जारी केलं. त्यात म्हटलं आहे की, ‘आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, टायगर श्रॉफने या घटनेबद्दल किंवा कोणत्याही संबंधित घटनांबद्दल अद्याप कोणतंही विधान केलेलं नाही, कोणताही व्हिडिओ शेअर केलेला नाही किंवा कोणतंही अधिकृत संभाषण केलेलं नाही. आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, अनेक सोशल मीडिया पेजेस आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर बनावट कथा पसरवल्या जात आहेत.’

‘टायगर श्रॉफच्या नावाने एआय व्हिडिओ आणि पूर्वनियोजित कथा तयार केल्या जात आहेत. या पूर्णपणे खोट्या आहेत. लोकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं हे तयार केलं गेलं आहे. निवेदनात पुढे म्हटलं आहे की, ‘आम्ही अशा कोणत्याही मजकुराचं समर्थन करत नाही किंवा त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही. आम्ही माध्यम संस्था, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया पेजेसना आवाहन करतो की, कोणतीही माहिती प्रकाशित करण्यापूर्वी तिची पडताळणी करावी. वैयक्तिक फायद्यासाठी कोणतीही खोटी माहिती प्रकाशित करू नका.’

या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, असा खोटा मजकूर तयार करताना, त्याचा प्रचार करताना किंवा तो प्रसारित करताना आढळलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा पेजवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. टायगरची टीम अशा खोट्या बातम्यांवर लक्ष ठेवून आहे. अखेरीस, लोकांना केवळ टायगर श्रॉफ आणि त्याच्या टीमनं शेअर केलेल्या माहितीवरच विश्वास ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, हल्ल्यानंतर टायगरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी, लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अनेक सेलिब्रिटींना धमक्या आणि भीती दाखवण्यात आली आहे. या यादीत सलमान खान आणि रोहित शेट्टी यांचा समावेश आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!