Govinda : मी स्वत: .. गोविंदाबद्दल लेक टीना आहुजा स्पष्टच बोलली

90 च्या दशकात गोविंदाच्या स्टाईलने लोकांचे हृदय जिंकले होते. त्यांचा फॅशन सेन्सही इतर स्टार्सपेक्षा वेगळा होता. चित्रपटांमध्ये त्याचे रंगीबेरंगी कपडे, अनोखा स्टाईल आणि डान्सिंग अंदाज चाहत्यांना खूप आवडायचे. आजही त्यांचा फॅशन लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. आता गोविंदाची मुलगी टीना आहुजा ही आपल्या वडिलांबाबत स्पष्ट बोलली आहे.

Govinda : मी स्वत: .. गोविंदाबद्दल लेक टीना आहुजा स्पष्टच बोलली
| Updated on: Oct 05, 2026 | 3:12 PM

अभिनेता गोविंदा (Govinda) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असला, तरी 90च्या दशकात त्याचा सिनेसृष्टीतील दबदबा मोठा होता. अभिनय आणि नृत्यासोबतच त्याचा अनोखा फॅशन सेन्सही त्यावेळी विशेष चर्चेचा विषय ठरायचा. सिनेमांमध्ये चमकदार आणि रंगीबेरंगी कपड्यांमधील गोविंदाचा अंदाज प्रेक्षकांना चांगलाच आवडत असे. आजही त्याच्या त्या स्टाइलची चर्चा होताना दिसते. आता गोविंदाची मुलगी आणि अभिनेत्री टीना आहुजा हिनेही वडिलांच्या 90च्या दशकातील फॅशनबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. टीना स्वतः गोविंदाची मोठी चाहती असून, तिला वडिलांचे चित्रपट, गाणी आणि त्यांचा खास स्टाइल खूप आवडतो.

मी स्वतः गोविंदाची फॅन

Loading...

टीना आहुजा हिने बॉम्बे काउचर वीक 2026 मध्ये सहभाग घेतला. यावेळी IANS सोबत झालेल्या खास संवादात तिला गोविंदाच्या 90च्या दशकातील फॅशनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्या काळात गोविंदा चित्रपटांमध्ये अनेकदा भडक आणि चमकदार रंगांचे कपडे परिधान करत असे. त्याच्या या फॅशनची आजही चर्चा होते, यावर टीना हसत प्रतिक्रिया दिली. वडिलांना स्वतःच्या फॅशनबद्दल आनंद वाटत असेल, तर त्यांना पाहून मलाही आनंद व्हायचा, असं टीना म्हणाली. गोविंदाला त्या अंदाजात पाहायला प्रेक्षकांनाही आवडत होतं आणि तिच्यासाठी हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट असल्याचं तिने सांगितलं.

90च्या दशकातील इतर कलाकारांच्या तुलनेत गोविंदाचा लुक अधिक मर्दानी आणि वेगळा होता. त्यामुळे त्यानेही त्या काळातील कलाकारांप्रमाणे फॅशनमध्ये काही वेगळे प्रयोग करायला हवे होते का, असा प्रश्न टीना यांना विचारण्यात आला. त्यावर तिने स्पष्टपणे नकार देत म्हटलं, “नाही, मला असं काहीच वाटलं नाही. मी स्वतः गोविंदाची फॅन आहे.” टीना पुढे म्हणाली की, तिला वडिलांचे चित्रपट, त्यांची गाणी आणि त्यांचा स्टाइल आवडतो. गोविंदाचा एकंदर अंदाजच तिला खूप भावतो, असंही तिने सांगितलं.

1987 मध्ये झालं गोविंदा आणि सुनीता आहुजाचं लग्न

गोविंदा आणि सुनीता आहुजा यांनी मार्च 1987 मध्ये लग्न केलं. मात्र, सुरुवातीच्या काळात दोघांनी त्यांचं लग्न सार्वजनिकपणे जाहीर केलं नव्हतं. 1988 मध्ये त्यांच्या मुलगी टीना हिचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या लग्नाची माहिती समोर आली. गेल्या काही काळापासून गोविंदाचं वैवाहिक आयुष्यही चर्चेत आहे. अलीकडेच तो लालबागचा राजा यांच्या दर्शनासाठी गेला होता. यावेळी त्याच्यासोबत चित्रपटातील सहकलाकार आणि त्याची कथित गर्लफ्रेंडकोमल राणी दिसल्याने त्यांच्या नात्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली.

आई सुनीता आहुजाबाबतच्या प्रश्नावर टीना गप्प

काही दिवसांपूर्वी पापाराझींनी टीना आहुजाला कुटुंबातील या वादाबाबत प्रश्न विचारला होता. कोमल राणी सोशल मीडियावर तिची आई सुनीता आहुजा यांच्याबाबत काही आरोप करत असल्याच्या पार्श्वभूमीवर टीनाला याबद्दल विचारण्यात आलं. मात्र, टीना हिने या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. “ कृपया या ठिकाणी आपण फक्त याच विषयावरच बोलू या. धन्यवाद,” असं म्हणत तिने कुटुंबातील वादावर भाष्य करणं टाळलं. त्यामुळे टीना हिने संवाद केवळ गोविंदाच्या फॅशन, त्यांच्या चित्रपटांबद्दल आणि वडिलांच्या स्टाइलविषयीच्या आपल्या पसंतीपुरताच मर्यादित ठेवला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us