TMKOC | रिअल लाईफ ‘जेठालाल’-‘टप्पू’मध्ये वाद? दिलीप जोशींनी उचलले मोठे पाऊल!

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) या मलिकेतील सगळीच पात्र लोकांच्या आयुष्यात इतकी मिसळली आहेत की, असं वाटतं खऱ्या आयुष्यात देखील ते पडद्यावर दिसत असल्याप्रमाणेच एकमेकांबरोबर राहत असतील. पण वास्तविक जीवनात या कलाकारांमध्येही वाद आणि मतभेद आहेत.

TMKOC | रिअल लाईफ ‘जेठालाल’-‘टप्पू’मध्ये वाद? दिलीप जोशींनी उचलले मोठे पाऊल!
तारक मेहता का उल्टा चष्मा

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) या मलिकेतील सगळीच पात्र लोकांच्या आयुष्यात इतकी मिसळली आहेत की, असं वाटतं खऱ्या आयुष्यात देखील ते पडद्यावर दिसत असल्याप्रमाणेच एकमेकांबरोबर राहत असतील. पण वास्तविक जीवनात या कलाकारांमध्येही वाद आणि मतभेद आहेत. याआधी अशीच काही वृत्त चर्चेत आली होती. पण आता अशी बातमी आली आहे की, जेठालाल आणि टप्पू यांच्यात ‘रिअल लाईफ’ वाद झाले आहेत (TMKOC Real life fight between Dilip Joshi and Tappu Fame Raj Anadkat).

या मालिकेत ‘टप्पू’ म्हणजेच अभिनेता राज अंदकत (Raj Anadkat) आणि ‘जेठालाल’ म्हणजे अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) यांच्यात काहीतरी वादावादी, रुसवे-फुगवे सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या आधी देखील दिलीप जोशी आणि ‘मेहता साहेब’ अर्थात अभिनेते शैलेश लोढा यांच्यात वाद झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, दोघांनी देखील हे वृत्त फेटाळून लावले.

सोशल मीडियावर केले अनफॉलो

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘बाप-लेक’ साकारणाऱ्या ‘टप्पू’ आणि ‘जेठालाल’ यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री दिसून येते. या दोघांच्या कॉमिक केमिस्ट्रीमुळे शोच्या प्रेक्षकांना त्यांना एकत्र बघायला आवडते. पण आता बातमी अशी आहे की, जेठालाल त्यांचा ऑन-स्क्रीन मुलगा टप्पू याच्यावर खऱ्या आयुष्यात देखील खूप रागावले आहे. या कारणामुळेच, त्यांनी इंस्टाग्रामवर ‘टप्पू’ म्हणजेच राज अंदकतला अनफॉलो केले आहे (TMKOC Real life fight between Dilip Joshi and Tappu Fame Raj Anadkat).

का रागावलेत दिलीप जोशी?

बातमीनुसार, टप्पू आणि जेठालाल यांची ऑन-स्क्रीन जोडी जबरदस्त असू शकते, परंतु या दोघांमध्ये सध्या काहीतरी बिनसलं आहे. वृत्तानुसार ज्येष्ठ अभिनेते असूनही दिलीप जोशी नेहमीच सेटवर वेळेवर पोहोचतात, तर राज अनेकदा सांगूनही नेहमी सेटवर उशीरा येतो. हा प्रकार बर्‍याच दिवसांपासून सुरू आहे आणि दिलीप जोशी यांना देखील राजमुळे शूटसाठी थांबून राहावे लागते. याच कारणामुळे दिलीप जोशी रागावले आहेत आणि त्यांनी राजला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे.

याआधी झाले वाद!

‘तारक मेहता …’ च्या कलाकारांमधील वादाचे हे वृत्त काही पहिल्यांदाच आलेले नाही. अलीकडेच या शोच्या महिला कलाकारांमधील परस्पर द्वेषाचे वृत्त समोर आले होते. यानंतर स्वत: सुनैना फौजदार यांनी स्पष्टीकरण दिले होते. याशिवाय दिलीप जोशी आणि शैलेश लोढा यांच्यातील वादावरही चर्चा झाली. यानंतर शैलेशने ही गोष्ट केवळ अफवा असल्याचे म्हटले होती आणि असे देखील म्हटले होते की, ते दोघेही खूप चांगले मित्र आहेत.

(TMKOC Real life fight between Dilip Joshi and Tappu Fame Raj Anadkat)

हेही वाचा :

Bigg Boss 15 | ‘बिग बॉस’चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार! पाहा कोण असणार नवे स्पर्धक

Best Feature Films : शॉर्टफिल्म पाहून बनवले गेले ‘हे’ जबरदस्त चित्रपट, पाहून आजही प्रेक्षक म्हणतात व्वा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI