हे 6 जण आहेत देशातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन्स, चौथ्याने केले 1 हजार चित्रपट
भारतातील प्रसिद्ध विनोदी कलाकारांची आणि त्यांच्या यशस्वी कारकिर्दीची ही एक झलक आहे. कपिल शर्मा, जॉनी लिव्हर, गौरव कपूर, ब्रह्मानंदम, वीर दास आणि राजपाल यादव यांसारख्या दिग्गजांची नेटवर्थ आणि त्यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय कामगिरी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

अभिनय करणं हे काही सोपं काम नाही. त्यातही विनोदी अभिनय करणं म्हणजे सर्वात अवघड काम. कॉमेडी सिनेमे किंवा कॉमेडी शोज भलेही हलके फुलके असो. पण कॉमेडी करणं हे महाकठीण काम असतं. तुमच्या अभिनयाच्या बळावर तुम्ही एखाद्याला रडवू शकता. पण कॉमेडी करण्यासाठी पाहिजे जातीचेच. कॉमेडीचा गुण हा अभिजातच असावा लागतो. आपल्या फिल्मी दुनियेत मात्र एकापेक्षा एक अधिक कॉमेडियन आहेत. आपल्या अभिनय आणि अचूक टायमिंगच्या बळावर त्यांनी प्रेक्षकांना पोटधरून हसायला भाग पाडलं आहे. त्यामुळेच कॉमेडियनचा सिनेमात नेहमी बोलबाला असतो. त्यांना चांगले पैसेही दिले जातात. अनेक कॉमेडियन तर गर्भश्रीमंत म्हणूनही ओळखले जातात. अशाच काही कॉमेडियनबाबत जाणून घेऊया.
कपिल शर्मा
कपिल शर्मा हे नाव विनोद वीरांमधील आघाडीचं नाव आहे. कपिल शर्माला जगभरातील लोक ओळखतात. कॉमेडियन, होस्ट आणि अभिनेता म्हणूनही तो परिचित आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शोमधून त्याला खरी ओळख मिळाली. आत त्याचा हा शो देशातील अनेक प्रेक्षकांचा आवडता शो ठरला आहे. या शोनंतर तो सर्वाधिक कमाई करणारा कॉमेडियन बनला आहे. त्याची नेटवर्थ 300 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.




जॉनी लीवर
जॉनी लिव्हर हे लिजंड कॉमेडियन आहेत. गेल्या तीन दशकांपासून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. जॉनी लिव्हर यांनी बॉलिवूडसह मराठी सिनेमातही काम केलंय. कॉमेडिची आर्ट म्हणून ओळख करून देण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांची नेटवर्थ 277 कोटी असल्याचं सांगितलं जातं.
गौरव कपूर
गौरव कपूर हा एक फेमस स्टँड अप कॉमेडियन आहे. तसेच तो युट्यूब स्टारही आहे. दैनंदिन जीवनातील गोष्टींवर व्यंग्य काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. यूट्यूब, लाइव्ह शो आणि ब्रँडच्या डिल्समधून गौरव भरपूर कमाई करतो. त्याची नेटवर्थ 90 कोटी असल्याचं सांगितलं जातं.
ब्रह्मानंदम
ब्रह्मानंदम हे देशातील सर्वात यशस्वी कॉमेडियन आहेत. ब्रह्मानंदम हे साऊथ सिनेमातील प्रसिद्ध नाव आहे. त्यांचा जन्म 1956मध्ये आंध्र प्रदेशात झाला होता. सुरुवातील शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर त्यांनी अभिनेता होण्याचं ठरवलं. त्यांनी सुमारे एक हजाराहून अधिक सिनेमात काम केलंय. त्यामुळे त्यांचं नाव गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं. त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांची विनोद करण्याची शैली हे तेलुगू सिनेमातील माइलस्टोन मानली जाते. मार्च 2025मध्ये त्यांची नेटवर्थ 490 कोटी होती.
वीर दास
वीर दास हे सुद्धा स्टँड अप कॉमेडियन आहे. ‘देल्ही बेली’ आणि ‘गो गोआ गॉन’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. नेटफिलिक्स स्पेशल आणि इंटरनॅशनल शोसाठी त्यांना जगभरात ओळखलं जातं. त्यांची नेटवर्थ 82 कोटीच्या आसपास आहे.
राजपाल यादव
राजपाल यादव हे एक प्रसिद्ध बॉलिवूड अॅक्टर आणि कॉमेडियन आहेत. आपल्या अभिनयाच्या बळावर ते दिग्दर्शकांचे आवडते कलाकार झाले आहेत. त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे. सिनेमात कितीही छोटा रोल असला तरी राजपाल यादव यांची वाहवा झाल्याशिवाय राहत नाही, इतक्या जबरदस्त ताकदीचा हा अभिनेता आहे. कॉमेडीशिवाय गंभीर भूमिकाही ते चांगल्या वठवतात. त्यांची नेटवर्थ 80 कोटीच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं.