टॉप टकरचे टीझर रिलीज, रश्मिका मंदानाचा जबरदस्त लूक!

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही तिच्या जबरदस्त अभिनयामुळे ओळखली जाते.

टॉप टकरचे टीझर रिलीज, रश्मिका मंदानाचा जबरदस्त लूक!

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही तिच्या जबरदस्त अभिनयामुळे ओळखली जाते. रश्मिका सोशल मीडियामध्ये खूप अ‍ॅक्टिव्ह असते चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. रश्मिकाची सुंदर आणि स्टाइलिश फोटो पाहून चाहते ही तिच्या प्रेमात पडले आहेत. नुकताच रश्मिका मंदाना आणि बादशाहच्या टॉप टकर गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. (Top Tucker song First teaser release)

या टीझरमध्ये रश्मिका मंदाना एका हटक्या लूकमध्ये दिसत आहे. गाण्याच्या व्हिडीओमध्ये काम करण्याची ही रश्मिकाची पहिलीच वेळ आहे. या व्हिडीओ टीझरमध्ये रश्मिकाने बरेच दागिने घातले आहे आणि डोक्यावर वेगवेगळ्या रंगाची पगडी बांधली आहे. चाहत्यांनी तिच्या रंगीबेरंगी लूकचे कौतुक देखील केले आहे.

रश्मिकाने तिच्या सोशल मीडियावर या गाण्याचे टीझर रिलीज केले आहे. टॉप टकरच्या टीझरमध्ये बादशाह, युवाशंकर राजा आणि अमित दिसत आहेत. या गाण्याला बादशाह आणि युवा शंकर राजा यांनी संगीत दिले आहे. रश्मिका काही महिन्यांपूर्वी गाण्याचे शूटिंग केलं होते.

संबंधित बातम्या :

खरा मित्र कोण?; बिग बी अमिताभ बच्चन यांनी सांगितली व्याख्या!

तलवारीनंतर कंगनाच्या हातात बंदूक ‘धाकड’ चा फोटो शेअर आणि म्हणाली- मृत्यूची देवी…

Tiger 3 | तुर्कीमध्ये सलमानच्या आगामी चित्रपटाचे शूट होणार !

(Top Tucker song First teaser release)

Published On - 5:27 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI