AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणबीर – श्रद्धा स्टारर Tu Jhooti Main Makkar सिनेमा ओटीटीवर येणार पाहता?

Tu Jhooti Main Makkar सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी, कसा आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या रणबीर कपूर - श्रद्धा कपूर यांच्या सिनेमाबद्दल सर्व डिटेल्स...

रणबीर - श्रद्धा स्टारर Tu Jhooti Main Makkar सिनेमा  ओटीटीवर येणार पाहता?
| Updated on: Mar 20, 2023 | 10:01 AM
Share

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभनेत्री श्रद्धा कपूर स्टारर ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkar) सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. अभिनेता शाहरुख खान याच्या ‘पठाण’ सिनेमानंतर सर्वत्र ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाची चर्चा आहे. ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाला चाहते आणि विश्लेषकांकडून देखील उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ८ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमातील श्रद्धा आणि रणबीर यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. सिनेमाचं दिग्दर्शक लव रंजन यांनी केलं आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. अनेकांनी श्रद्धा आणि रणबीर यांच्या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तुफान गर्दी केली. पण काही चाहत्यांना अद्यापही ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमा पाहता आलेला नाही. तर काही सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा करत आहेत.

‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लव रंजन यांचा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण त्यासाठी चाहत्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण निर्मात्यांकडून सिनेमाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित होणार याबद्दल कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. कोणताही सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास ४५ दिवसांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो. म्हणजे प्रेक्षकांना लवकरच सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाच्या माध्यमातून श्रद्धा आणि रणबीर यांची जोडी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली. त्यांच्या जोडीला चाहत्यांनी भरभरून प्रेम देखील दिलं. सिनेमाने ११ दिवसांत १०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सिनेमा किती रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सध्या सर्वत्र ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाची चर्चा आहे. सोशल मीडियावर सिनेमाचे काही व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. त्या व्हिडीओंना देखील नेटकऱ्यांकडून प्रेम मिळत आहे.

‘तू झूठी, मैं मक्कार’ सिनेमात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत डिंपल कपाडिया, बोनी कपूर, हसलीन कौर, राजेस जैस, आयशा राजा मिश्रा या सेलिब्रिटींची देखील महत्त्वाची भूमिका आहे. ‘तू झूठी, मैं मक्कार’ सिनेमानंतर रणबीर नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिच्यासोबत ‘एनिमल’ सिनेमात दिसणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?