AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe : इकडे तुकाराम मुंढेंची कारवाई, तिकडे बडा अभिनेता गजब बोलून गेला; म्हणाला अशा कारवाया…

मनोज वाजपेयींनी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या प्रामाणिकपणाचे आणि धडाडीच्या कामाचे कौतुक केले आहे. आजच्या समाजात प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करणारी व्यक्ती चर्चेत येते आणि सेलिब्रिटी बनते, असे वाजपेयी म्हणाले.

Tukaram Mundhe : इकडे तुकाराम मुंढेंची कारवाई, तिकडे बडा अभिनेता गजब बोलून गेला; म्हणाला अशा कारवाया...
Tukaram Mundhe
| Updated on: Sep 04, 2026 | 9:33 PM
Share

Manoj Bajpayee Statement : महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) हे त्यांच्या धडाधड कारवायांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांनी एफडीएची सूत्र हातात घेतल्यावर राज्यभरात कारवाया सुरू केल्या, त्यामुळे भेसळखोराचं धाबं दणाणलं. त्यांच्या बेधडक अंदाजाची, स्पष्टवक्तेपणाची आणि कारवायांची सध्या बरीच चर्चा असून आता अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही त्यांचा हा अंदाज आवडताना दिसत आहे. प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनीही तुकाराम मुंढे यांची काम करण्याची पद्धत आणि कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा, त्यांचं समर्पण याचं कौतुक केलं. आजच्या काळात जर एखादी व्यक्ती अतिशय प्रामाणिकपणे आणि झोकून देऊन काम करत असेल, तर लोकांना तीच गोष्ट अद्भुत वाटते आणि ती व्यक्ती चर्चेत येते.

प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती सेलिब्रिटी बनते

ANI शी संवाद साधताना अभिनेता मनोज वाजपेयी यांनी समाजातील बदलत्या परिस्थितीवर भाष्य करताना प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची किंवा तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्याची विशिष्ट जबाबदारीसाठी नियुक्ती केली जाते. मात्र, जेव्हा एखादा अधिकारी कोणत्याही अपेक्षेशिवाय पूर्ण प्रामाणिकपणे आणि समर्पणाने आपले कर्तव्य बजावत असतो, तेव्हा त्याचीच लोकांमध्ये चर्चा होऊ लागते, असं ते म्हणाले. एखादा अधिकारी आपल्या जबाबदारीशी प्रामाणिक राहून काम करताना दिसला की लोकांना त्याचं कौतुक वाटते. त्यातून संबंधित अधिकारी सोशल मीडियावरही चर्चेत येतो आणि काही वेळातच त्याचा व्हिडिओ किंवा काम व्हायरल होतं.

याच मुद्द्यावर मनोज वाजपेयी पुढे म्हणाले, ‘ याचा सरळ अर्थ असा आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण प्रामाणिकपणे आपले काम करते, तेव्हा ती सेलिब्रिटी बनते.’ मात्र समाजाच्या सध्याच्या परिस्थितीशी या गोष्टीचा संबंध जोडताना मनोज वायपेयी यांनी एक महत्त्वाचा प्रश्नही उपस्थित केला. एखाद्या व्यक्तीने केवळ आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले म्हणून ती प्रसिद्ध होते, ही बाबच खरं तर विचार करण्यासारखी आहे, असं त्यांनी म्हटलं. आपल्या जबाबदारीशी प्रामाणिक राहणे ही सामान्य आणि

फूड सेफ्टीबाबत तुकाराम मुंढे यांची कठोर भूमिका

हाराष्ट्राच्या अन्नसुरक्षा विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी म अन्नसुरक्षा नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कठोर भूमिका घेतली. जिथे सुरक्षा नियमांचे उल्लंघन झालेलं आढळून येतं, एफडीएकडून अशा खाद्य व्यवसायांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून एफडीएने अनेक ठिकाणी धाड टाकून, अनेक आस्थापनं, हॉटेल्स, रेस्टॉरंटवर कारवाई केली, प्रसंगी काहीचे परवानेही निलंबित केले. त्यांच्या या धडक कारवायाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा होते.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच