पहिलाच चित्रपट अन् एका रात्रीत झाला स्टार, अचानक बॉलिवूडला केला रामराम, जगण्यासाठी करतो ‘हे’ काम
'तुमसे अच्छा कौन है' या चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता आता परदेशात असं आयुष्य जगतोय की त्याला ओळखणंही होईल कठीण असे वाटत आहे.

अनेक कलाकारांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळाते तर काही लोकांना अनेक वर्षही लागता. काही लोक एका चित्रपटांतून खूप प्रसिद्धी मिळवतात पण नंतर मात्र ते अचानक गायब होतात. एक असा अभिनेता आहे ज्याला एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली पण नंतर मात्र तो अचानक गायब झाला आणि आता थेट तो कॅनेडामध्ये असं आयुष्य जगत आहे.
अभिनेता नकुल कपूर ‘तुमसे अच्छा कौन है’ या चित्रपटातून रातोरात यश मिळाल्यानंतर, अचानक गायब झाला. काही दिवसांपूर्वीच, त्याच्या मृत्यूच्या खोट्या बातमीने सर्वांना धक्का बसला. नकुल कपूर हा जिवंत असून देशाबाहेर कॅनडात आपले जीवन जगत आहे. एकेकाळी आपल्या देखण्या दिसण्याने आणि ‘आँख है भारी भारी’ सारख्या सुपरहिट गाण्यांनी लोकांना मोहित करणारा नकुल कपूर आता चित्रपटसृष्टीतून पूर्णपणे गायब झाला आहे. इतकेच नाही, तर तो आता भारतात राहत नाही. नकुल कॅनडात लोकांना योगा शिकवतो. सध्या तो परदेशात योगाच्या महत्त्वाचा प्रसार करत आहे.
सूत्रांनुसार, लोकांना योग शिकवण्याचे नकुल कपूरचे स्वप्न होते. तो सध्या हे स्वप्न जगत आहे. तो नॉर्थ व्हँकुव्हरमध्ये ‘डिव्हाईन लाईट’ नावाचे योग केंद्र चालवतो. हा व्यवसाय त्याच्या उत्पन्नाचा स्रोतही आहे. आज या अभिनेत्याचे नाव कदाचित परिचित नसेल, पण त्याची गाणी आजही त्याच्या निरागस चेहऱ्याची आठवण करून देतात. ‘तुमसे अच्छा कौन है’ या चित्रपटात आरती छाब्रिया आणि किम शर्मा यांनी नकुलसोबत काम केले होते. या चित्रपटातील नकुलच्या देसी शैलीचे त्याच्या चाहत्यांनी खूप कौतुक केले.
नकुल कपूरने आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९९८ मध्ये ‘हो गई है मोहब्बत तुमसे’ या अल्बमने केली. २००१ मध्ये, त्याने ‘आजा मेरे यार’ या चित्रपटात काम केले. २००२ मध्ये, नकुलला ‘तुमसे अच्छा कौन है’ मध्ये भूमिका मिळाली. या चित्रपटाने नकुल कपूरला रातोरात स्टार बनवले. या चित्रपटाने त्याला स्टार बनवले असले तरी, अनेक वर्षे या अभिनेत्याला त्याच्या मनासारखे काम मिळू शकले नाही. त्याने टेलिव्हिजनमध्येही नशीब आजमावले, पण ते जमले नाही. त्यानंतर, नकुलने झगमगाट मागे सोडून परदेशात शांततापूर्ण जीवन निवडले.
