Kamya Punjabi : नवऱ्याने मुलीसमोर असं काय केलं, अभिनेत्रीने थेट घेतला घटस्फोटाचा निर्णय, पोटगी तर…
Kamya Punjabi : अभिनेत्री काम्या पंजाबी आज दुसऱ्या नवऱ्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण पहिल्या नवऱ्याने अभिनेत्रीला मारहाण देखील केली. अखेर मुलीसमोर घडलेल्या घटनेनंतर अभिनेत्रीने थेट घटस्फोटाचा निर्णय घेतला. पोटगीबद्दल देखील अभिनेत्रीने मोठी खुलासा केला.

टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता काम्या तिच्या कोणत्या भूमिकेमुळे किंवा मालिकेमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठचा खुलासा केला आहे. लग्नानंतर अभिनेत्रीला शारीरिक हिंसाचाराचा सामना करावा लागला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, काम्या हिने धक्कादायक खुलासा केला. चेहऱ्यावरील जखमा लपवण्यासाठी अभिनेत्री मेकअपचा आधार घ्यायची… एवढंच नाही कर, पहिला नवरा अभिनेत्रीवर सतत निर्बंध लादायचा… पण मुलीसमोर घडलेल्या एका घटनेनंतर त्यांनी नातं संपवण्याचा निर्णय घेतला.
25 व्या वर्षी काम्या हिचं पहिलं लग्न…
काम्या हिने वयाच्या 25 व्या वर्षी पहिले लग्न उद्याजोक बंटी नेगी याच्यासोबत लग्न केलं. जवळपास तीन वर्ष काम्या आणि बंटी यांनी एकमेकांना डेट केलं. पण लग्नपूर्वी देखील त्यांच्यामध्ये वाद व्हायचे… दोघांमध्ये कायम झगडे व्हायचे. काम्या हिच्या आई – वडिलांनी देखील बंटी याच्यासोबत नात्याचा पुढे विचार करु नकोस असं सांगितलं होतं. पण काम्या हिला तिच्या प्रेमाला सोडयचं नव्हते..
अभिनेत्री म्हणाली, ‘लग्नापूर्वी देखील आमच्यामध्ये कायम वाद व्हायचे. तेव्हाच आम्हाला समजून जायचं होतं की, हे नातं फार काळ टिकणार नाही आणि त्रासदायक ठरेल. माझ्या आई – वडिलांनी देखील मला खूप समजावलं. पण पहिलं प्रेम कोणाला सोडायचं नव्हतं. मला त्याचं काही ऐकायचं देखील नव्हतं. पण मी माझं लग्न टिकवण्यचा पूर्ण प्रयत्न केला. लोक म्हणतात, माझ्या आयुष्यातील 13 वर्ष उद्ध्वस्त केली. पण मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले होते. नंतर माझ्यावर पश्चातापाची वेळ येणार नही … ‘ असा विचार मी कायम केला.
पुरस्कार सोहळ्यातील एक घटना सांगत काम्या म्हणाली, ‘पुरस्कार सोहळ्यात मी मेकअपने चेहऱ्यावरील जखमा लपवलेल्या होत्या. बाहेरून सर्वकाही ठिक वाटत होतं. पण मनातल्या मनात मी त्रस्त होते. पुरस्कार सोहळ्यात होती, पण मला माझीच लाज वाटत होती… मी विचार करत होती की, मी कोण आहे आणि काय करत आहे? घरात मला मारहाण केली जाते आणि बाहेर मी पुरस्कार घेत आहे… असं आयुष्य मी का जगत होते? मला कोणाला आणि काय सिद्ध करुन दाखवायचं होतं?’
सांगायचं झालं तर, मुलीसमोर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर अभिनेत्रीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. पण अभिनेत्री पोटगीची मागणी केली नाही. तिने मुलीच्या जबाबदारी घेतली आणि एकटीने मुलीचा सांभाळ केला. 2003 मध्ये काम्या हिने बंटी नेगी याच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर काम्या हिने 10 फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्ली येथील उद्योजक शलभ डांग याच्यासोबत लग्न केलं. आज अभिनेत्री दुसऱ्या नवऱ्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
