AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udta Teer Review: देशभक्ती, संभ्रम अन् कॉमेडीचा धमाका; निशाण्यावर लागला ‘उडता तीर’, पैसा वसूल आहे आयुष्मान-साराचा सिनेमा

Udta Teer Review: आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेला 'उडता तीर' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कसा आहे, त्याच्या जमेच्या बाजू कोणत्या, त्याबद्दल जाणून घ्या..

Udta Teer Review: देशभक्ती, संभ्रम अन् कॉमेडीचा धमाका; निशाण्यावर लागला 'उडता तीर', पैसा वसूल आहे आयुष्मान-साराचा सिनेमा
आयुषमान खुराना (उडता तीर रिव्ह्यू)Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 23, 2026 | 11:17 AM
Share

Udta Teer Review: अभिनेता आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांचा बहुचर्चित ‘उडता तीर’ (Udta Teer) हा चित्रपट आज 23 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. देशभक्ती, गुप्तहेरगिरी, अ‍ॅक्शन आणि विनोद यांचा अनोखा संगम असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. दिग्दर्शक आकाश कौशिक यांनी या चित्रपटातून वेगळ्या धाटणीची कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात कितपत यशस्वी ठरते? आयुष्मान आणि सारा यांची जोडी मनोरंजन करण्यात यशस्वी होते का? जाणून घेऊयात या चित्रपटाचा रिव्ह्यू..

नेमकी काय आहे चित्रपटाची कथा?

‘उडता तीर’ची कथा एका पाकिस्तानी गुप्तहेराभोवती फिरते. आयुष्मान खुराना याने चित्रपटात बिलाल अहमद ही भूमिका साकारली आहे. बिलाल हा पाकिस्तानी गुप्तहेर असून एका मोहिमेसाठी भारतात येतो. मात्र, एका अपघातानंतर त्याची स्मरणशक्ती जाते. त्यानंतर तो स्वतःला भारतीय दहशतवादविरोधी यंत्रणेचा अधिकारी विक्रांत समजू लागतो. विशेष म्हणजे, ज्या देशाविरोधात काम करण्यासाठी त्याला पाठवण्यात आलेलं असतं, त्याच देशाच्या सुरक्षेसाठी तो काम करू लागतो. या अनपेक्षित परिस्थितीतून अनेक गैरसमज, गोंधळ आणि विनोदी प्रसंग घडतात. चित्रपटाची कथा याच ओळखीच्या गोंधळावर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर आधारलेली आहे.

आयुष्मान खुरानाचा अभिनय कसा आहे?

आयुष्मान खुराना पुन्हा एकदा आपल्या विनोदी अंदाजात प्रेक्षकांसमोर आला आहे. दोन वेगवेगळ्या ओळखींच्या कात्रीत अडकलेल्या व्यक्तीची भूमिका त्याने चांगल्या पद्धतीने साकारली आहे. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव, संवादफेक आणि विनोदी प्रसंगांमधील सहजता चित्रपटाची जमेची बाजू ठरते. दुसरीकडे, सारा अली खाननेही आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. तिची व्यक्तिरेखा कथेला पुढे नेण्यास मदत करते. मात्र, या चित्रपटात राहुल बोस यांचा अभिनय विशेष लक्ष वेधून घेतो. विनोदी प्रसंगांमधील त्यांची टाइमिंग प्रेक्षकांना हसवते. राम कपूर, गुलशन ग्रोव्हर, बृजेंद्र काला आणि सुहैल नैय्यर यांसारख्या कलाकारांनीही आपल्या भूमिका चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत. दिवंगत अभिनेते मुकुल देव यांची उपस्थितीही चित्रपटासाठी महत्त्वाची ठरते.

पहा ट्रेलर-

चित्रपटातील जमेच्या आणि कमकुवत बाजू

चित्रपटातील चुकीची ओळख, गुप्तहेरगिरी आणि विनोदी प्रसंग यांचा मेळ ही त्याची प्रमुख जमेची बाजू आहे. सुरुवातीला कथा रुळावर येण्यासाठी थोडा वेळ घेते. त्यामुळे पहिल्या अर्ध्या तासात काही प्रेक्षकांना संयम ठेवावा लागू शकतो. मध्यंतरानंतरही काही ठिकाणी कथानकाची गती मंदावते. मात्र, त्यानंतर पुन्हा विनोदी प्रसंगांमुळे मनोरंजनाचा वेग वाढतो. चित्रपटातील गाणी फारशी प्रभावी वाटत नसली, तरी पार्श्वसंगीतामुळे काही प्रसंग अधिक उठावदार होतात. दिग्दर्शकाने गंभीर विषयाला हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

पाहावा की नाही?

देशभक्ती आणि विनोद यांचा संगम असलेले चित्रपट आवडत असतील, तर ‘उडता तीर’ एकदा पाहायला हरकत नाही. आयुष्मान खुरानाचा अभिनय आणि राहुल बोस यांची विनोदी शैली चित्रपटाला मनोरंजक बनवते. मात्र, वेगवान कथानक आणि थराराची अपेक्षा असणाऱ्यांना काही भाग संथ वाटू शकतात.

रेटिंग: 5 पैकी 3 स्टार.

Follow Us
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान