
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. त्या हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदारही आहे. नुकतीच झालेली ढगफुटी, आणि पुरामुळे हिमाचल प्रदेशातील अनेक भागात प्रचंड नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी खासदार कंगना रानौत नुकत्याच तिथे पोहोचल्या, मात्र तिथे असं काही झालं ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
हिमाचल प्रदेशातील पावसाने प्रभावित भागांना कंगान रानौत यांनी भेट दिली, तेव्हा त्यांचा मंडी येथील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका स्थानिक युट्यूबरला मुलाखत देत असताना, जवळच उपस्थित असलेल्या लोकांनी कंगनाचा व्हिडिओ बनवला, त्यानंतर तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
50 रुपयांची कमाई, 15 लाख पगार
आपत्तीनंतर मंडीच्या खासदार कंगना राणौत यांनी मनाली गाठली आणि सोलंगनाला परिसराला भेट दिली. भूस्खलनामुळे बाधित झालेल्या गावकऱ्यांनाही त्या भेटल्या. त्यावेळी व्हिडिओमध्ये कंगना यांना सार्वजनिक समस्यांशी संबंधित प्रश्न विचारले होते, मात्र त्याची उत्तर त्यांनी काही वेगळीच दिली. मनाली येथील माझ्या रेस्टॉरंटने काल फक्त 50 रुपयांची कमाई केली आणि पगार व देखभालीचा खर्च 15 लाख रुपये आहे. यादरम्यान, एका युट्यूबरने नुकसानीबद्दल विचारले तेव्हा कंगन यांनी त्याला थेट सुनावलं, माझ्यावर चढू नका, तर फक्त प्रश्न विचारा, अस त्या स्पष्ट म्हणाल्या. कंगना यांचा हा व्हिडिओ जवळच्या लोकांनी मोबाईल फोनवर रेकॉर्ड केला.
मी सिंगल वुमन, माझे प्रॉब्लेमही समजा ना..
पूरस्थितीमुळे लोकाचं जीवन विस्कळीत झालंय, अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठ आलेल्या खासदार कंगान यांनी पूरग्रस्तांसमोर आपलचं रडगाणं सुरू केलं. माझं रेस्टॉरंटही इथेच आहे, आणि काल फक्त 50 रुपयांचा बिझनेस झालं, असं म्हणत त्यांनी आपलंच दु:ख सांगण्यास सुरूवात केली. कंगना म्हणाल्या, ” तू माझ्यावर हल्ला करायला आला आहेस की मला प्रश्न विचारायला? माझ्यावर हल्ला करू नकोस, प्रश्न विचार. आम्हीही इथेच राहतो. जर तुम्ही आमच्यावर हल्ला करायला आलात तर आम्ही काम कसं करायचं? आधी शांत हो आणि हे जाणून घे की माझेही इथेच घर आहे. माझ्यावर काय परिस्थिती ओढावली असेल. माझंही रेस्टॉरंट इथेच आहे, काल फक्त 50 रुपयांचा बिझनेस झाला, 15 लाखांचे पगार आहे. माझ्यावर काय ओढवलं असेल, तुम्ही माझी परिस्थिती पण समजून घ्या ना. मी देखील माणूस आहे, एकटी मुलगी आहे. या समाजात सिंगल वुमन आहे.. माझे प्रॉब्लेमही समजून घ्या” असं त्यांनी समोरच्यांना सुनावलं.
हिमाचल प्रदेश के बाढ़ प्रभावित इलाके में एक महिला जब अपनी स्थानीय सांसद कंगना रनौत से अपना कष्ट साझा किया तो उनसे सांसद का जवाब सुनें! pic.twitter.com/nuVOXLev76
— Narendra Nath Mishra (@iamnarendranath) September 18, 2025
त्यानंतर कंगना पुढे म्हणाल्या, “मी इंग्लंडची राणी आहे आणि काहीही करत नाहीये असं समजून माझ्यावर हल्ला करू नका. मी स्वतःची कमाई करणारी आहे. केंद्र सरकारने आम्हाला (हिमाचल प्रदेश) 10 हजार कोटींहून अधिक रुपये दिले आहेत. आज, आपण येथे कोणते काम झाले आहे हे जाणून घेण्यासाठी आलो आहोत. राज्य सरकारने किती काम केले आहे हे जाणून घेण्यासाठी आलो आहोत”. कंगना यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटीजन्सनी त्यांना खूप ट्रोल केलं आहे.
असे नेते तर जनतेला मारतील, अशी कमेंट एकाने केली. तर या काकू पुढल्या वेळेस जिंकू शकमार नाही, असं दुसऱ्या युजरने लिहीलं. अनेकांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला आहे.