AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉनच्या आयुष्यात अनेक मुलींची एन्ट्री; ‘या’ चार सुंदर अभिनेत्रींसोबत रंगली दाऊदची लव्हस्टोरी

दाऊदच्या मनात एक दोन नाही तर, अनेक सुंदर मुलींनी केलं राज्य... 'या' बॉलिवूड अभिनेत्रींसोबत देखील रंगली डॉनची लव्हस्टोरी

डॉनच्या आयुष्यात अनेक मुलींची एन्ट्री; 'या' चार सुंदर अभिनेत्रींसोबत रंगली दाऊदची लव्हस्टोरी
| Updated on: Feb 15, 2023 | 12:17 PM
Share

don dawood ibrahim love story : गुन्हेगारीच्या जगात आपलं नाव कमावलेल्या मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (underworld don dawood ibrahim) याचं बॉलिवूडसोबत एकेकाळी फार जवळचं नातं होतं. शिवाय बॉलिवूडमध्ये देखील डॉन दाऊद इब्राहिमचा दबदबा होता. गुन्हेगारी विश्वात ज्याप्रकारे दाऊद इब्राहिम याने नाव कमावलं, त्याचप्रमाणे डॉन त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आला. अनेक सुंदर मुलींसोबत डॉनचे संबंध होते. या यादीमध्ये बॉलिवूडच्या चार प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहेत. डॉनसोबत नाव जोडल्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आला. आजही डॉनच्या लव्हस्टोरीबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात.

डॉन दाऊद इब्राहिम याची पहिली गर्लफ्रेंड मंदाकिनी १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमामुळे मंदाकिनी एक रात्रीत प्रसिद्धीझोतात आली. पण त्यानंतर तिची चर्चा प्रेमप्रकरणामुळं होवू लागली. मंदाकिनीचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडलं जाऊ लागलं. डॉनच्या मनात मंदाकिनी हिने राज्य केलं. अनेक ठिकाणी मंदाकिनी डॉनसोबत देखील दिसली. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर मंदाकिनी डॉनच्या आयुष्यातून दूर झाली.

डॉन दाऊद इब्राहिम याची दुसरी गर्लफ्रेंड अनिता अयूब ९० च्या दशकात देव आनंद यांच्यासोबत झळकलेली अभिनेत्री अनिता अयूब पाकिस्तानी होती. दिसायला प्रचंड सुंदर असलेली अनिता अयूब बॉलिवूडमध्ये मात्र अपयशी ठरली. अनिता अयुब तिच्या सौंदर्यासाठी मात्र कायम प्रसिद्ध होती. पोलिसांपासून स्वत:ला लपवून दुबईत बसलेल्या दाऊदच्या मनात देखील अनिता अयुबसाठी खास जागा होती. शिवाय अनिता अयुब हिच्यासाठी दाऊदने मुंबईतील एका चित्रपट निर्मात्याची हत्या केल्याची माहिती समोर आली. दाऊद आणि अनिता यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. त्यानंत अनिता अयूब पकिस्तानी मालिका आणि सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

डॉन दाऊद इब्राहिम याची तिसरी गर्लफ्रेंड महविश हयात पाकिस्तानातील अभिनेत्री मेहविश हयात आणि डॉन दाऊद इब्राहिम यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. दाऊतमुळे पाकिस्तानी कलाविश्वात मेहविश हयात हिला सिनेमे मिळतात असं देखील अनेकदा समोर आलं. महविश हयात डॅनपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. शिवाय जेव्हा तिला तमगा-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वात मोठा सन्मान देण्यात आला तेव्हा देखील महविश हयात तुफान चर्चेत आली. त्यानंतर दोघांच्या प्रेमाच्या चर्चा तुफान रंगू लागल्या. ( affairs relationships)

डॉन दाऊद इब्राहिम याची चौथी गर्लफ्रेंड सुजाता जेव्हा दाऊत मुंबईमध्ये रहायचा तेव्हा त्याच्या आयुष्यात सुजाता म्हणून एक मुलगी होती. दाऊदचं मुंबईत सायकलचं दुकान होतं. दुकानाजवळचं सुजाताचं घर होतं. दाऊतच्या मनात सुजातासोबत लग्न करण्याची दाट इच्छा होती. पण सुजाताच्या कुटुंबियांना दाऊतसोबत असलेलं नातं मान्य नव्हतं. कारण जाता पंजाबी कुटुंबातील होती तर दाऊद इब्राहिम मुस्लिम कुटुंबातून होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.