
Salman Khan Starrer Bajrangi Bhaijaan: ‘बंजरंगी भाईजान’ सिनेमाची कथा आजही चाहत्यांना भावूक करते. सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं आहे. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी सिनेमाबद्दल एक किस्सा सांगितला, जो कोणाला माहिती देखील नसेल… सिनेमात अभनेता सलमान खान याने एका हिंदू व्यक्तीची भूमिका साकारली. सिनेमात सलमान एका पाकिस्तानी मुलीला तिच्या देशात सुखरुप सोडवण्याची जबाबदारी घेतो. ज्यासाठी सलमान खान देशाच्या सीमे पार पाकिस्तानात जाऊन पोहचतो. या प्रवासात अभिनेत्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागतो… या प्रवासात सलमानला अनेक असे भेटतात, जे अभिनेत्याला मदत करतात…
दिग्दर्शक कबीर खान म्हणाले, सिनेमात एक सीन आहे, ज्यामध्ये ‘जय श्री राम’चा नारा दिला आहे. सेंसॉर बोर्डाने सिनेमातून ‘जय श्री राम’ नारा काढून टाकण्यास सांगितला होता.. मुस्लिम समाजाच्या भावनांना ठेच पोहचू नये म्हणून ‘जय श्री राम’ काढण्यास बोर्डाने सांगितलं होतं.
कबीर बेदी म्हणाले, ‘एका सीन मध्ये ओम पुरी ‘जय श्री राम’ म्हणतात आणि ते मला सेंसॉर बोर्डाने काढून टाकण्यास सांगितलं होतं.’ मी बोर्डाला का म्हणून विचारलं, यावर बोर्ड म्हणाला, ‘मुसलमान व्यक्तींना वाईट वाटेल…’ पुढे कबीर म्हणाले, ‘मी देखील मुसलमान आहे माझं नाव काय आहे? आणि मला काहीच अडचण नाही…’ असं कबीर म्हणाले.
पुढे एक उदाहरण देत कबीर खान म्हणाले, ‘मी अशा दिल्लीमध्ये मोठा झालोय जेथे ‘जय श्री राम’ राजकीय उपयोगासाठी वापरलं जात नाही. प्रत्येक जण याचा वापर करतो… मी जुन्या दिल्लीत राहिलो आहे. जेथे जय श्री राम म्हणणं ‘हॅलो’, ‘बाय…’ म्हटल्या सारखं आहे… तेव्हा मी विचारलं यामध्ये वाईट वाटण्यासारखं काय आहे? यासाठी मी लढलो आणि माझ्या निर्णयावर ठाम राहिलो…’
‘बजरंगी भाईजान’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेता सलमान खान मुख्य भूमिकेत होता. तर अभिनेत्री करीना कपूर हिने देखील मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमाला चाहत्यांनी देखील भरभरुन प्रतिसाद दिला. सिनेमातील गाण्यांना देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने मोठी कमाई केली.