AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहानपणी सुटली आईची साथ, बापाने थाटला दुसरा संसार, वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

वयाच्या 6 व्या वर्षी सुटली आईची साथ, बापाने थाटला दुसरा संसार, अभिनेत्री म्हणाली, 'आम्हाला दुसरी आई नको होती, पण वडिलांना...'

लहानपणी सुटली आईची साथ, बापाने थाटला दुसरा संसार, वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
फाईल फोटो
| Updated on: Aug 13, 2025 | 10:01 AM
Share

अनेक असे कलाकार आहेत जे इंडस्ट्रीमधील नाही. पण त्यांनी स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे. प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाल्यानंतर सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक चाहते उत्सुक असतात. अशीच एक अभिनेत्री देखील आहे, जिने फार कमी वयात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण अभिनेत्री खासगी आयुष्यात अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव घेतला आहे. लहानपणी आई – वडिलांचा घटस्फोट, त्यानंतर वडिलांचं दुसरं लग्न… यावर अभिनेत्रीने स्वतः मौन देखील सोडलं आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सुम्बुल तौकीर आहे. ‘इत्ती सी खुशी’ मालिकेमुळे अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. मालिकेच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र सुम्बुल हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सुम्बुल जेव्हा 6 वर्षांची होती तेव्हाच तिच्या आई – वडिलांचा घटस्फोट झाला. आई – वडिलांच्या घटस्फोटावर अभिनेत्री म्हणाली, ‘आई – वडिलांचा घटस्फोट झाला तेव्हा मी फक्त 6 वर्षांची होते. बरेच दिवस मला माहिती नव्हतं की माझे आई – वडील वेगळे झाले आहेत. कारण आई – वडिलांनी कधीच आमच्या समोर भांडणं केली नाहीत. आई आम्हाला भेटायला यायची, आम्ही एकत्र फिरायला जायचो…’

‘एका गोष्टीचा मला आनंद आहे आणि ती गोष्ट म्हणजे आई – वडिलांनी कधीच त्यांच्या नात्याचा परिणाम आमच्यावर होऊ दिला नाही.’ असं देखील सुम्बुल म्हणाली. सध्या सर्वत्र सुम्बुल हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

एवढंच नाही तर, वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं. अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही वडिलांना सांगितलं होतं, दुसऱ्या आईला आमचा नकार आहे. पण आमच्या वडिलांना एका जोडीदाराची गरज होती. कारण आम्ही कायम त्यांच्यासोबत नसू… अशात कोणी तरी हवं आहे, जी आम्ही नसल्यावर आमच्या वडिलांची काळजी घेईल…’ असं देखील सुम्बुल म्हणाली.

सुम्बुल कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील सुम्बुल कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील सुम्बुल कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुम्बुल कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी.
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू.