AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुक्मिणीला पळवून नेलं आणि…, श्रीकृष्णाबद्दल असं का म्हणाली दिशा पटानीची बहीण, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

दिशा पटानीची बहीण माजी लष्करी अधिकारी खुशबू पटानी यांचं श्रीकृष्णाबद्दल मोठं वक्तव्य, 'रुक्मिणीला पळवून नेलं आणि...', अनेकांकडून संताप व्यक्त, सध्या सर्वत्र खुशबू यांच्या वक्तव्याची चर्चा...

रुक्मिणीला पळवून नेलं आणि..., श्रीकृष्णाबद्दल असं का म्हणाली दिशा पटानीची बहीण, 'तो' व्हिडीओ व्हायरल
फाईल फोटो
| Updated on: Aug 13, 2025 | 8:44 AM
Share

अभिनेत्री दिशा पटानी हिची बहीण आणि माजी लष्करी अधिकारी खुशबू पटानी कायम वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी खुशबू पटानी यांनी एक अथान मुलीला तिच्या आईपर्यंत पोहोचवलं होतं. तेव्हा सर्वत्र खुशबू पटानी यांचं कौतुक झालं. त्यानंतर खुशबू पटानी यांनी कथावाचक अनिरुद्धाचार्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत मुलींची बाजू मांडली. तेव्हा मात्र खुशबू यांच्यावर टीका करण्यात आली. आता खुशबू यांनी श्रीकृष्ण यांच्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे खुशबू तुफान चर्चेत आहेत.

खुशबू पटानी यांनी प्रेम, लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या असं काही बोलून गेल्या ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. श्रीकृष्ण यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर खुशबू यांनी टीकेचा सामना करावा लागत आहे. सध्या खुशबू यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

व्हिडीओ शेअर करत खुशबू म्हणाल्या, ‘श्रीकृष्ण यांनी रुक्मिणीला द्वारकेत पळवून नेलं होतं. असा विचार तुम्ही करणार देखील नाही. हे सर्व समाजाच्या विरोधात आहे… असं तुम्हाला वाटेल. पण श्रीकृष्णाने समाजातील सर्व आदर्श मोडले आहेत…’ खुशबू पटानी यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देखील देत आहेत.

खुशबू यांच्या व्हिडीओवर संताप व्यक्त करत एक नेटकरी म्हणाला, ‘कलियूगातील महिला… श्रीकृष्णाने समाजातील कोणतेच नियम मोडले नाहीत. धर्माच्या संरक्षण आणि प्रतिष्ठेला अडथळा ठरणारे बंधन त्यांनी तोडले आहे.’ तर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘विनाशकालेय विपरीत बुद्धि’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ही कधीच सुधारणार नाही…’, ‘भगवान श्रीकृष्णजींनी तुमच्यासारख्या विकृत आणि घृणास्पद कृत्यांना संरक्षण देण्यासाठी नाही तर धर्म आणि धार्मिक शिष्टाचाराचे संतुलन राखण्यासाठी कायद्याचं पालन केलं आहे.’ असं देखील एक नेटकरी म्हणाला आहे.

कथावाचक अनिरुद्धाचार्या यांना काय म्हणाल्या खुशबू…

अनिरुद्धाचार्य म्हणाले, ‘काही मुलं 25 वर्षांच्या मुलींची निवड करतात आणि त्यांनी घेवून येतात. पण त्या 25 वर्षांच्या मुली अधीच 4 ठिकाणी तोंड मारून आलेल्या असतात…’, या वादग्रस्त विधानावर खुशबू यांनी टीका केली. बाबाला जर लिव्हइन रिलेशनशिपची समस्या आहे, तर मुलांवर बाबा प्रश्न का नाही उपस्थित करत. जे लग्नाआधी रिलेशनशिपमध्ये राहण्याची निवड करतात. त्यांनी फक्त मुलींवर प्रश्न का उपस्थित केला.’ खुशबू कायम त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.