Raanbaazaar: हे चक्रीवादळ नक्की कोणाभोवती फिरणार? ‘रानबाजार’मध्ये तगडी स्टारकास्ट

Raanbaazaar: हे चक्रीवादळ नक्की कोणाभोवती फिरणार? 'रानबाजार'मध्ये तगडी स्टारकास्ट
Raanbaazaar
Image Credit source: Instagram

या सीरिजच्या टीझरवर अर्चना निपाणकर, आदिनाथ कोठारे, धनश्री काडगावकर, अक्षया गुरव, ऋतुजा बागवे, पियुष रानडे यांसारख्या कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 17, 2022 | 4:32 PM

‘रानबाजार’ (Raanbaazaar) या वेब सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू झाली. अभिजित पानसे लिखित, दिग्दर्शित ही सीरिज प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांच्या टीझरमधील बोल्ड अंदाजाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. त्यानंतर आता या सीरिजमधील इतरही कलाकारांच्या चेहऱ्यावर पडदा उचलण्यात आला आहे. या वेब सीरिजमध्ये मराठीतील तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या सीरिजमध्ये सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे. बुधवारी (18 मे) ‘रानबाजार’चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

‘सुंदर चेहरे, गुपित गहिरे’ असं कॅप्शन देत अभिनेत्री उर्मिला कोठारेनं सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तेजस्विनी, प्राजक्तासोबत उर्मिला आणि माधुरी पवार यांचेही चेहरे पहायला मिळत आहेत. याचसोबत प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्येही काही कलाकार पहायला मिळत आहेत. सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे आणि अभिजीत पानसे हे चेहरे या फोटोत दिसत आहेत. त्यामुळे सीरिजमध्ये तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

पहा फोटो-

 

View this post on Instagram

 

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

या सीरिजच्या टीझरवर अर्चना निपाणकर, आदिनाथ कोठारे, धनश्री काडगावकर, अक्षया गुरव, ऋतुजा बागवे, पियुष रानडे यांसारख्या कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्लॅनेट मराठी, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत रावण फ्युचर प्रॉडक्शन्स, अभिजित पानसे आणि अनिता पालांडे निर्मित ‘रानबाजार’ ही वेब सीरिज 20 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें