Urfi Javed आता घालणार नाही तोकडे कपडे? चाहत्यांची माफी मागत म्हणाली…

'तुमच्या समोर बदललेली उर्फी...' मॉडेलने तोकड्या कपड्यांबद्दल केलं मोठं वक्तव्य, तिने माफी देखील मागितली पण..., नक्की काय आहे उर्फीच्या कपड्यांचं सत्य

Urfi Javed आता घालणार नाही तोकडे कपडे? चाहत्यांची माफी मागत म्हणाली...
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2023 | 3:27 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून झगमगत्या विश्वात चर्चेत असलेला विषय म्हणजे मॉडेल उर्फी जावेद हिचा फॅशन सेन्स. उर्फी कायम तिच्या तोकड्या कपड्यांमुळे चर्चेत असते. उर्फीला तिच्या तोकड्या कपड्यांमुळे टीकेचा देखील सामना करावा लागला. पण तरी देखील उर्फी तिच्या फॅशनमुळे तुफान चर्चेत असते. शिवाय ट्विटरच्या माध्यमातून देखील अभिनेत्री कायम चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसते. आता तर उर्फीने असं वक्तव्य केलं आहे, ज्यावर कोणालाही विश्वास बसणार नाही. तोकड्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या उर्फीने सर्वांची माफी मागितली आहे. शिवाय आता स्वतःला बदलेल असं देखील उर्फी ट्विटमध्ये म्हटली आहे.

एक ट्विट करत उर्फी म्हणाली, ‘मी जे कपडे घातले, त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावतात. त्यामुळे मी सर्वांची माफी मागते. आतापासून तुमच्या समोर बदललेली उर्फी असेल.. बदललेले कपडे… माफी…’ सध्या उर्फीचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

खरं म्हणजे, उर्फीने माफी तर मागितली, पण त्यामागे देखील एक ट्विस्ट आहे. उर्फी स्वतःला बदलणार नसून तिने सर्वांना एप्रिल फूल केलं आहे. शनिवारी अभिनेत्री आणखी एक ट्विट करत म्हणाली, ‘एप्रिल फूल… मला माहिती आहे मी खूप बालीश आहे….’ सध्या उर्फी तिच्या ट्विटमुळे तुफान चर्चेत आहे. शिवाय अनेकांनी तिच्या ट्विटवर प्रतिक्रिया देखील दिली आहे.

 

 

सांगायचं झालं तर, उर्फीच्या तोकड्या कपड्यांना अनेकांनी विरोध केला. पण अनेकांनी मात्र तिचं कौतुक देखील केलं. उर्फीच्या फॅशनचं कौतुक फक्त अभिनेत्री करीना कपूर हिने नाही तर, याआधी देखील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी केलं आहे. अभिनेता रणवीर सिंग, रॅपर हनी सिंग यांनी देखील उर्फीच्या फॅशनचं कौतुक केलं आहे.

मॉडेल उर्फी जावेद हिच्या फोटो आणि व्हिडीओची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. अनेकांनी उर्फीच्या फॅशनचा विरोध केला तर, अनेकांनी तिचं समर्थन केलं. अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री कंगना रनौत आणि मसाबा गुप्ता यांनी देखील उर्फीच्या कपड्यांवर वक्तव्य केलं. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये रणवीर सिंह यांनी उर्फीच्या कपड्यांचा उल्लेख फॅशन आयकॉन म्हणून केला.

उर्फी जावेदच्या स्टाईलला अभिनेता रणबीर कपूरचा विरोध What Women Want या चॅट शोमध्ये करीनाने रणबीरला उर्फीचा फोटो दाखवला आणि विचारलं ही कोण आहे? यावर रणबीर म्हणाला, ‘ही उर्फी आहे का?’ अभिनेता पुढे म्हणाला, ‘अशा प्रकारची फॅशन मला बिलकूल आवडत नाही..’ आणि उर्फीच्या फॅशनचा रणबीर याने बॅड टेस्ट म्हणून उल्लेख केला होता.