बाथरुममधील त्या व्हायरल व्हिडीओबद्दल अखेर बॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली ‘मीच सांगितलं…’

चित्रपट रिलीजच्या वेळेस एका बॉलिवूड अभिनेत्रीचा बाथरुममधील एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. त्यामुळे अभिनेत्रीची प्रचंड चर्चाही झाली होती. मात्र आता याच व्हायरल व्हिडीओ संदर्भात अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे.

बाथरुममधील त्या व्हायरल व्हिडीओबद्दल अखेर बॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली ‘मीच सांगितलं…’
Follow us
| Updated on: Jan 22, 2025 | 2:08 PM

बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या प्रमोशनसाठी किंवा, प्रसिद्धीसाठी अभिनेत्री किंवा अभिनेते कधी कधी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मग तो एखादा बोल्ड सीन व्हायरल करणं असो किंवा खासगी आयुष्याबद्दलची एखादी अफवा पसरवणे असो, असे अनेक प्रकार होताना दिसतात. असाच काहीसं घडलं होतं एका अभिनेत्रीबाबत.

चित्रपट रिलीजच्या वेळेस या अभिनेत्रीचा एक बाथरुममधील व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. त्यामुळे अभिनेत्रीची प्रचंड चर्चाही झाली होती. ही अभिनेत्री आहे उर्वशी रौतेला. उर्वशीचा बाथरुममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याचं दिसून आलं होतं. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीने हा व्हिडीओ म्हणजे ‘घुसपेठीया’ चित्रपटातील एक दृष्य असल्याचा दावा केला होता. मात्र आता याच व्हिडीओबद्दल अखेर उर्वशीने खुलासा केला आहे.

 बाथरुममधील व्हायरल व्हिडीओसंदर्भात मोठा खुलासा 

उर्वशीने एका मुलाखतीत व्हायरल झालेल्या बाथरुममधील व्हिडीओसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. ‘घुसपेठीया’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपली परवानगी घेऊनच हा बाथरुममधील व्हिडीओ व्हायरल केला होता, असा दावा उर्वशीने केला आहे.

‘घुसपेठीया’ चित्रपटाच्या निर्मात्यांवर कर्ज असल्याने त्यांनी या नव्या चित्रपटाची चर्चा व्हावी या उद्देशाने हा व्हिडीओ व्हायरल केला होता असा धक्कादायक दावा उर्वशीने केला आहे. निर्मात्यांवर एवढं मोठं आर्थिक संकट आलं होतं की त्यांना त्यांची जमीन विकावी लागली असती. ही परिस्थिती लक्षात घेऊन मीच त्यांना हा सीन लिक करण्यासाठी परवानगी दिली, असं उर्वशी म्हणाली.

‘माझी परवानगी घेतली होती…’

उर्वशीने निर्मात्यांची परिस्थिती सांगताना म्हटली की, “त्यांच्यावर काही कर्ज होतं आणि कर्ज फेडताना ते अडचणीत आलेले. त्यांना त्यांची जमीन विकावी लागली असती. ते रस्त्यावर आले असते. त्यामुळे ते माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्या बिझनेस मॅनेजरबरोबर यासंदर्भात चर्चा करुन पुढचा निर्णय घेतला. त्यांनी आमची परवानगी घेऊनच हा व्हिडीओ व्हायरल केला होता.

हा व्हिडीओ चित्रपटामधलाच होता. आम्ही तो व्हायरल करण्यापूर्वी किंवा तो शूट करण्यासाठी काही वेगळे कष्ट घेतले नाहीत. आपण हा व्हिडीओ आधीच व्हायरल केला तर चित्रपटाची चर्चा होईल असं निर्मात्यांचं म्हणणं होतं. या माध्यमातून जागृती निर्मिती करण्याचाही प्रयत्न केला. खास करुन तरुणींने सतर्क राहण्याचा संदेश यातून देण्याचा आमचा उद्देश होता,” असही उर्वशीने म्हटलं आहे.

‘घुसपेठीया’ कधी रिलीज झालेला ?

‘घुसपेठीया’ हा चित्रपट 9 ऑगस्ट 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तमिळमधील ‘थिरुतू पायली 2’ या चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटामध्ये उर्वशीबरोबरच अक्षय ओबेरॉय, विनित कुमार सिंह आणि गोविंद नामदेवही झळकले होते.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.