लताबाईंसारखे गायच्या हेच त्यांचे दुर्भाग्य… अभिनेत्याची थेट पोस्ट, म्हणाला, त्यांनी…

वैभव मांगले कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियावरून आपले मत व्यक्त करतात. यादरम्यानच एक पोस्ट त्यांनी शेअर केली, ज्याची तूफान चर्चा रंगताना दिसत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सुमन कल्याणपूर यांच्याबद्दल लिहिले आहे.

लताबाईंसारखे गायच्या हेच त्यांचे दुर्भाग्य... अभिनेत्याची थेट पोस्ट, म्हणाला, त्यांनी...
Suman Kalyanpur and Vaibhav Mangle
| Updated on: Jun 03, 2026 | 11:37 AM

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी 700 हून अधिक गाण्यांना आवाज दिला. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी जगाचे निरोप घेतला. मुंबईमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाली. निंबोनीचा झाडा मागे चंद्र झोपला… अशाप्रकारची गाणी त्यांनी गायली. केंद्र सरकारने त्यांना 2023 झाली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. फक्त मराठीच नाही तर अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. लता मंगशेकर यांच्या काळात सुमन कल्याणपूरही नावारूपाला आल्या. अगदी कमी कालावधीमध्येच त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकली. यादरम्यानच सुमन कल्याणपूर यांच्या निधनानंतर अभिनेता वैभव मांगले यांनी एक पोस्ट शेअर केली. त्याने मोठी चर्चा रंगत आहे. हेच नाही तर त्यांनी म्हटले की, सुमन कल्याणपूर यांचे एकच दुर्भाग्य होते की, त्यांचा आवाज लता मंगेशकर यांच्यासारखा होता.

वैभव मांगले यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, ओठावरी विरला ग आसावला सूर.. सुरुवातीचा काही काळ सुमन ताई लता बाईं सारखच गातं होत्या… अनेक अशी उदाहरणं आहेत, ज्यात पटकन सांगता येत नाही की लता बाई की सुमन ताई गातायत. एक द्वंद्व गीत आहे ते तर कानात प्राण आणून ऐकल तरीही सांगता येतं नाही … नेमकं कुणी काय गायलय.
सुमन ताई लता बाईंसारखं  गातात हेच दुर्भाग्य होतं..

साक्षात लता बाई असताना.. सुमन ताईंना कोण बोलवणार.. याची सल त्यांना ही असणार पण ताईंच मोठे पण असं की त्यांनी कधी हे कुठे ही बोलून नाही दाखवलं… इतका सुज्ञपणा म्हणा किंवा दिलदारपणा म्हणा त्यांच्या पाशी होता… लता बाईं बरोबर त्याची मैत्री होती.. त्यांचा आवाज लता बाईं सारखा जरूर होता.. पण स्वर लगाव दोघींचे भिन्न होते.. दमसास वेगळा होता..

अन्याय करणारा फक्त माणूस नसतो परिस्थिती असते … शारीरिक कुवत… आपल्याला अनेक गोष्टी मॅनेज न करता येणं ..कमी पणा घेऊन मागे मागे राहण हे असत पण जे आपल्या वाट्याला आलाय ते प्रामाणिक पणे आणि चोखपणे पार पाडणं हे आपल्या हाती नक्की असतं ,ते सुमन ताईनी नक्की केलं… असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. सुमन कल्याणपूर यांचे लता बाईंसारखं  गातात हेच दुर्भाग्य होतं, असे वैभव मांगलेनी थेटपणे म्हटले.

Follow Us