AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूड कलाकार मराठी कलाकारांना घाटी म्हणून.. मराठी अभिनेत्याचा याचा धक्कादायक खुलासा, थेट..

अभिनेता वैभव मांगले याने केलेल्या आरोपाने एकच खळबळ उडाली. थेट बॉलिवूडवर हे आरोप करण्यात आली. मराठी कलाकारांना कशाप्रकारची वागणूक दिली जाते, यावर थेटपणे बोलण्यात आले. हेच नाही तर मराठी कलाकारांना कसे हिणवले जाते हे देखील सांगितले.

बॉलिवूड कलाकार मराठी कलाकारांना घाटी म्हणून.. मराठी अभिनेत्याचा याचा धक्कादायक खुलासा, थेट..
Vaibhav Mangle
| Updated on: May 27, 2026 | 3:22 PM
Share

अभिनेता वैभव मांगले याने त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये धमाकेदार भूमिका केल्या. वैभव मांगलेने बॉलिवूडवर अत्यंत गंभीर आरोप केले, त्याने एकच खळबळ उडाली. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकाराला नक्की काय समजतात आणि काय बोलतात यावर थेट भाष्य केले. हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार मराठी कलाकारांना कशाप्रकारे वागणूक देतात, यावर ते थेटपणे बोलला. हेच नाही तर सिनेसृष्टीत कलाकार मराठी कलाकारांना थेट घाटी समजतात. तिथे कोणीही मराठी कलाकाराला हिरो किंवा हिरोईन बनू देत नाहीत. यादरम्यानच वैभवने माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर यांच्याही नावाचा उल्लेख केला. त्या इंडस्ट्रीनं भूरळ आपल्याला कधीही घातली नसल्याचेही त्याने म्हटले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वैभव मांगलेने खळबळ उडवणारे आरोप केले.

वैभव मांगले याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मराठी कलाकार हिंदीत चमकले, चमकणार आणि चमकतील हे फालतू कोडकाैतुक पहिले बंद करा. तिथे आपण चमलो म्हणजे आपण भारी कलाकार? हा सर्व बिनडोकपणा आहे. लोक आणि हिंदीत नाव कमावलं म्हणून कुणी मराठी रसिक हिंग लावून विचारतं नाही त्याला…मराठीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या भूमिकाच तिथे फक्त मराठी कलाकारांना देतात.

माधुरी आणि नाना पाटेकर यांना सोडून कोणालाही किंमत देत नाहीत. घाटी म्हणून मराठी कलाकारांना संबोधतात. त्यांनी पुढे म्हटले की, तिथे एक आकस आहे, कलाकारांबद्दल. कधीही किंमत दिली जा नाही मराठी कलाकारांना… आमचे अस्सल ते अव्वल फालतुगिरी… प्रशांत दामले, उमेश कामत, प्रिया बापट, भरत जाधव, मुक्ता बर्वे, निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे, प्रसाद ओक, स्पृहा… खूप महत्वाचे आणि खूप खूप मोठे कलाकार आहेत. धन्यवाद…

वैभव मांगलेंची सोशल मीडिया पोस्ट..

त्यांनी पुढे कंसात लिहिले की, आता काही महाभाग म्हणतील की, याला कुणी काम दिले नाही वाटतंय म्हणून हे सुचतंय.. पण सांगून ठेवतो मला कधीची त्या इंडस्ट्रीनं भूरळ घातली नाही. किवा तिथे काही भारी वाटले नाही. आता वैभव मांगलेची पोस्ट तूफान व्हायरल होत आहे. यापूर्वीही अनेक कलाकारांनी अशाचप्रकारची गंभीर आरोप केली आहेत.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...