AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाटकाचा प्रयोग सुरु असताना वैभव मांगले स्टेजवर कोसळले, प्रकृती स्थिर

सांगली : अभिनेते वैभव मांगले यांना नाटकाचा प्रयोग सुरु असतानाच रंगमंचावर चक्कर आली. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज अगोदर व्यक्त करण्यात आला, पण हृदयविकाराचा झटका आला नाही, असं स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिलंय. त्यांना उपचारासाठी सांगलीतील क्रांती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर वैभव मांगलेंना डिस्चार्ज देण्यात आलाय. सांगलीत अलबत्या गलबत्या या नाटकाचा प्रयोग सुरु असताना हा प्रकार […]

नाटकाचा प्रयोग सुरु असताना वैभव मांगले स्टेजवर कोसळले, प्रकृती स्थिर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM
Share

सांगली : अभिनेते वैभव मांगले यांना नाटकाचा प्रयोग सुरु असतानाच रंगमंचावर चक्कर आली. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज अगोदर व्यक्त करण्यात आला, पण हृदयविकाराचा झटका आला नाही, असं स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिलंय. त्यांना उपचारासाठी सांगलीतील क्रांती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर वैभव मांगलेंना डिस्चार्ज देण्यात आलाय.

सांगलीत अलबत्या गलबत्या या नाटकाचा प्रयोग सुरु असताना हा प्रकार घडला. वैभव मांगले अचानक कोसळल्यानंतर प्रयोग थांबविण्यात आला. प्रयोगासाठी शेवटचे पाच मिनिटे उरले होते. वैभव मांगले उकाड्यामुळे कोसळल्याचं अगोदर सांगण्यात आलं. यानंतर डॉक्टरांनी स्टेजवरच त्यांची तपासणी केली. यानंतर उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

वैभव मांगले यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. अशक्तपणामुळे चक्कर आल्याचं त्यांनी सांगितलं. सांगलीत ऊन्हाचा तडाखा जास्त आहे. रगमंचावर एसी नसल्याने अणि हेवी मेकअप असल्याने मला अशक्तपणा आला. त्यामुळे चक्कर आली आणि कोसळलो. हृदयविकाराचा झटका नव्हता. मी आता व्यवस्थित आहे, अशी प्रतिक्रिया वैभव मांगले यांनी दिली.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला