मुंबई- बॉलिवूड इंडस्ट्रीतून पुन्हा एकदा चाहत्यांना गुड न्यूज मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आलिया भट्टने मुलीला जन्म दिला. त्यानंतर बिपाशा बासूच्या आयुष्यातही चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. आता अभिनेता वरुण धवन लवकरच बाबा होणार असल्याचं कळतंय. खुद्द सलमान खानने याबाबतची हिंट दिली. आपल्या आगामी ‘भेडिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुण धवन ‘बिग बॉस 16’च्या सेटवर पोहोचला होता. यावेळी सलमानने वरुणसमोर या ‘गुड न्यूज’चा उल्लेख केला.