AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारा अली खानच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट करतेय पलक तिवारी? होणार जान्हवी कपूरची जाऊबाई?

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतंच पलकला वीर पहाडियासोबत पाहिलं गेलं. हा व्हिडीओ पाहून दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सारा अली खानच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट करतेय पलक तिवारी? होणार जान्हवी कपूरची जाऊबाई?
Veer Pahariya and Palak TiwariImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 15, 2023 | 9:28 AM
Share

मुंबई : 15 डिसेंबर 2023 | टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून तिने फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्यानंतर आता पलक ही कार्तिक आर्यनच्या ‘भुलभुलैय्या 3’ या चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. पलक तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच तिचं नाव सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत जोडलं गेलं होतं. या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत पाहिलं गेलं. त्यानंतर आता पलकचं नाव आणखी एका हँडसम हँकशी जोडलं जातंय. हा हँडसम हँक अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाचा भाऊ वीर पहाडिया आहे.

पलकला गुरुवारी रात्री शिखर पहाडियाचा भाऊ वीर पहाडियासोबत पाहिलं गेलं. हे दोघं डिनर डेटनंतर एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडले. वीर आणि पलकला एकत्र पाहून नेटकऱ्यांमध्ये दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. ‘कालपर्यंत इब्राहिम होता आणि आज हा’, असं एकाने लिहिलं. तर ‘नशिब, इब्राहिम वाचला’, असं दुसऱ्याने म्हटलंय. इब्राहिम अली खान आणि वीर पहाडियाशिवाय पलकचं नाव ‘द आर्चीज’ फेम अभिनेता वैदांग रैनाशीही जोडलं गेलं होतं.

शिखर पहाडिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीर आणि शिखर हे भाऊ-भाऊ आहेत. अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर एकमेकांना डेट करत आहेत. जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे. तर वीरचं नाव याआधी अभिनेत्री सारा अली खानसोबत जोडलं गेलं होतं.

पलक तिवारी तिच्या डेब्युसोबतच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली. बॉलिवूडच्या विविध पार्ट्यांमध्येही पलकला आवर्जून पाहिलं जातं. इंडस्ट्रीत पाऊल ठेवताच पलकचं नाव सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानशी जोडलं गेलं. या दोघांना एकत्र एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पाहिलं गेलं होतं. त्यावेळी पलकने पापाराझींपासून स्वत:चा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दिलेल्या विविध मुलाखतींमध्ये तिला इब्राहिमला डेटिंग करण्याबद्दल प्रश्न विचारला असता तो फक्त मित्र असल्याचं तिने स्पष्ट केलं होतं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?