Dharmendra: अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत खालावली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत खालावली असून त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Dharmendra: अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत खालावली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 2:38 PM

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची तब्येत खालावली असून त्यांना मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. मे महिन्यातही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चार दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. व्यायाम करताना अचानक पाठीत दुखू लागल्याने त्यांना मे महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. रुग्णालयातून घरी परतल्यावर धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला होता. “प्रत्येकाला आपली क्षमता काय आहे हे माहित असावं आणि त्यानुसारच त्याने कामं करावीत. क्षमतेपेक्षा अधिक काहीच करू नये,” असं ते म्हणाले या व्हिडीओत म्हणाले होते. अभिनेते धर्मेंद्र हे 86 वर्षांचे आहेत.

धर्मेंद्र यांचं खरं नाव धरम सिंग देओल आहे. त्यांच्या वडिलांचं नाव केवल किशन सिंह देओल आणि आईचे नाव सतवंत कौर आहे. धर्मेंद्र यांचं बालपण साहनेवाल गावात गेलं. जवळपास सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री सुरैयाचा ‘दिल्लगी’ हा चित्रपट गावापासून मैलो दूर असलेल्या थिएटरमध्ये जाऊन पाहिला आणि ते इतके प्रभावित झाले की, त्यांनी चित्रपटांमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ‘दिल्लगी’ हा चित्रपट 40 हून अधिक वेळा पाहिला होता.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

धर्मेंद्र यांच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 1960मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाने झाली. पण त्यांना ‘फूल और पत्थर’ या चित्रपटामुळे खरी प्रसिद्धी मिळाली. चित्रपटसृष्टीत काम करण्यापूर्वी ते रेल्वेत नोकरी करत होते. धर्मेंद्र यांनी त्यांच्या सहा दशकांच्या दीर्घ कारकिर्दीत ‘सत्यम’, ‘बंदिनी’, ‘शोले’, ‘जुगनू’, ‘अनुपमा’, ‘धर्मवीर’ आणि ‘चुपके-चुपके’ असे अनेक उत्तम चित्रपट केले. धर्मेंद्र यांनी काही दिवसांपूर्वीच करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. यामध्ये जया बच्चन, शबाना आझमी, आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्याही भूमिका आहेत. पुढच्या वर्षी 10 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.