Dharmendra: धर्मेंद्र यांचं निधन दोन दिवसाआधीच झालं होतं? बड्या अभिनेत्रीचा दावा; म्हणाली, ते माझ्या स्वप्नात…

Dharmendra: बॉलिवूडचे ही-मॅन अभिनेते धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देओल कुटुंबीयांनी तातडीने अंत्यसंस्कार केले. चाहत्यांना त्यांचे अंतिम दर्शनही घेता आले नाही. आता त्यांचे निधन दोन दिवसांपूर्वी झाल्याचा दावा एका अभिनेत्रीने केला आहे.

Dharmendra: धर्मेंद्र यांचं निधन दोन दिवसाआधीच झालं होतं? बड्या अभिनेत्रीचा दावा; म्हणाली, ते माझ्या स्वप्नात...
Dharmendra
Image Credit source: Tv9 Network
Updated on: Nov 27, 2025 | 3:46 PM

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. निधनानंतर लगेचच अभिनेते धर्मेंद्र यांचे घाईघाईत अंत्यसंस्कारही करण्यात आले. त्यांचे अंतिम दर्शन घेण्याची फॅन्सची इच्छा देखील अपूर्ण राहिली. आता त्यांच्या निधनाबाबत बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने धक्कादायक दावा केला आहे. तिने सांगितले की धर्मेंद्र यांचे निधन दोन दिवस आधी झाले होते. ही अभिनेत्री कोण आहे? तिने नेमकं काय सांगितलं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

“धर्मेंद्र हे देशाचे हिरो होत”

धर्मेंद्र यांच्या निधनाविषयी बोलणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत आहे. तिने नुकताच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये तिने ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे अंतिम दर्शन फॅन्सना न दाखवल्याबाबत प्रश्न उपस्थित केले. तिच्या मते, अभिनेत्याला ज्या राजकीय सन्मानासह निरोप द्यावा तसा देओल कुटुंबीयांनी दिला नाही. अभिनेत्रीने आपल्या निवेदनात सांगितले, “धर्मेंद्र संपूर्ण देशाचे हिरो होते, मोठ्यांपासून लहानांपर्यंत त्यांच्या अभिनयाचे चाहते होते. बिग बॉसदरम्यान मी त्यांच्यासोबत स्टेजवर डान्सही केला होता, पण त्यांच्या फॅन्सना त्यांचे अंतिम दर्शन दाखवले गेले नाही. ते फक्त देओल कुटुंबाचे भाग नव्हते. मान्य आहे ते तुमचे वडील होते, आम्ही याचा आदर करतो पण ते तुमचे वडील होण्यापूर्वी ते देशाचे हिरो होते, आमचे हिरो होते.”

“देओल कुटुंबाने असे का केले?”

तिने पुढे सांगितले की जसे श्रीदेवी आणि राजेश खन्ना यांना राजकीय सन्मानासह निरोप देण्यात आला, तसे धर्मेंद्र यांच्यासोबत केले नाही. त्यांच्या स्मरणार्थ एक फूलही ठेवले गेले नाही. आम्हाला कळत नाही की देओल कुटुंबाने हे का केले? पण मी इथे सांगू इच्छिते की ते आमचे हिरो होते आणि ते या सन्मानाचे हक्कदार होते. देशभरात त्यांचे लाखो चाहते आहेत, जे त्यांना शेवटच्या वेळी पाहू इच्छित होते.

याशिवाय राखीने सांगितले, “त्यांचे निधन दोन दिवसांपूर्वी झाले होते. मला अनेकांनी सांगितले. मला स्वप्नात ते स्वतः आले होते. तेथील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनीही सांगितले होते. मला खूप दुःख झाले की त्यांच्या फॅन्सना त्यांना भेटू दिले गेले नाही.”

धर्मेंद्र यांच्या निधनामुळे राखीने वाढदिवस केला पोस्टपोन

या प्रेस कॉन्फरन्समध्ये राखीने आपल्या वाढदिवसाबाबत बोलताना सांगितले की माझा वाढदिवसही २५ नोव्हेंबरला होता आणि पार्टीची पूर्ण तयारी झाली होती. पण निधनाची बातमी कळताच आम्ही पार्टी कॅन्सल केली.