AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंकिता लोखंडे हिच्या आधी ‘ही’ अभिनेत्री होती विकी जैनची गर्लफ्रेंड, जाणून व्हाल थक्क

Ankita Lokhande : अंकिता लोखंडे हिची आयुष्यात एन्ट्री होताच, विकी जैन याने सोडली 'या' अभिनेत्रीची साथ, अनेक वर्ष विकी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या होता प्रेमात... कोण होती 'ती' अभिनेत्री?

अंकिता लोखंडे हिच्या आधी 'ही' अभिनेत्री होती विकी जैनची गर्लफ्रेंड, जाणून व्हाल थक्क
| Updated on: Dec 25, 2023 | 12:10 PM
Share

मुंबई | 25 डिसेंबर 2023 : अभिनेत्री अंकिता लोखंड आणि पती विकी जैन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या दोघे देखील ‘बिग बॉस 17’ मध्ये दमदार स्पर्धक म्हणून सक्रिय आहेत. बिग बॉसमध्ये गेल्यापासून विकी आणि अंकिता त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. एवढंच नाही तर, नॅशनल टीव्हीवर विकी जैन याने पत्नी अंकिता लोखंडे हिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. ज्याची चर्चा देखील सर्वत्र रंगली. सोशल मीडियावर दोघांचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.

विकी आणि अंकिता यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये विकी आणि अंकिता यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

विकी आणि अंकिता यांच्या नात्याबद्दल अनेकांना माहिती आहे. पण अंकिता हिची आयुष्यात एन्ट्री होण्यापूर्वी विकी टीव्ही विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत होता. विकी जैन लग्नापूर्वी टीव्ही अभिनेत्री टिया बाजपेई हिला डेट करत होता. अनेक वर्ष टिया आणि विकी रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

View this post on Instagram

A post shared by Tia Bajpai (@tiabajpai)

विकी याच्या पास्ट रिलेशनशिप बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. पण अंकिता हिच्या एक्स – बॉयफ्रेंडबद्दल अनेकांना माहिती आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत अंकिता सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. अंकिता बिग बॉगमध्ये देखील सुशांत याच्याबद्दल कायम बोलताना दिसते.

‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या सेटवर अंकिता आणि विकी यांच्यामध्ये प्रेम बहरलं होतं. दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अंकिता हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत याचं नाव अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं.

छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर सुशांत याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण अभिनेत्याच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला. 2020 मध्ये सुशांत याने स्वतःचं आयुष्य संपवलं. आज सुशांत जिवंत नसला तरी, त्याच्या आठवणी आजही चाहत्यांमध्ये आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?