सॅम बहादूर चित्रपटाबद्दल विकी कौशल याचा मोठा खुलासा, चित्रपटाचे शूटिंग संपल्यावर अभिनेत्याला थेट..
विकी कौशल हा त्याच्या आगामी सॅम बहादूर या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विकीचा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सॅम बहादूर हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित नक्कीच आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. आता हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

मुंबई : विकी कौशल हा सध्या त्याच्या आगामी सॅम बहादूर चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना विकी काैशल हा दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ नक्कीच बघायला मिळतंय. मेघना गुलजार यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार झालाय. काही दिवसांपूर्वीच विकी कौशल याने या चित्रपटाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, तेंव्हापासूनच चाहते हे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
सॅम बहादूर हा चित्रपट भारतातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकी कौशल हा मुख्य भूमिकेत आहे. मात्र, सॅम माणेकशॉ यांचे पात्र साकारणे विकी काैशल याच्यासाठी नक्कीच सोपे काम नव्हते. याचा खुलासा स्वत: विकी कौशल यानेच केला आहे. काही गोष्टींबद्दल बोलताना नुकताच विकी कौशल हा दिसला.
विकी म्हणाला, चित्रपटाचा एक अत्यंत महत्वाचा सीन आम्ही थेट इंडियन मिलिटरी अकादमीच्या कॅडेट्ससोबत शूट केला. यादरम्यानच्या काळात दररोज त्याला तब्बल 10 पुशअपसह त्याचा व्यायाम हा पूर्ण करावा लागत असतंय. हेच नाही तर त्याला दररोज शूटिंग संपल्यानंतर कितीही थकलेला असतानाही त्यांच्यासोबत तब्बल 10 इमिटेशन पुशअप करावे लागत.
विकी कौशल म्हणाला, मी कितीही थकलो तरीही मला हे काम करावे लागतच असत. मी खरोखरच इतकी जास्त शिस्तबद्ध जागा यापूर्वी कधीच बघितली नव्हती. सॅम बहादूर चित्रपटासाठी विकी काैशल याने खूप जास्त मेहतन ही नक्कीच घेतलीये. सॅम बहादूर चित्रपटाकडून विकी कौशल याच्यासह निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. या दिवशीच रणबीर कपूर याचा देखील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
कतरिना कैफ हिने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना कतरिना कैफ ही दिसली. कतरिना कैफ हिने सांगितले की, एकाच घरात असूनही तिची आणि विकी काैशल याची भेट होत नाहीये. कतरिना कैफ म्हणाली की, मी माझ्या चित्रपटामध्ये बिझी आणि विकी त्याच्या चित्रपटांमध्ये. फक्त आम्ही दिवाळी एकत्र येत साजरी केली.
