विकी कौशलच्या ‘छावा’ला मोठा फटका! अडीच तासांचा सिनेमा… नेमकं काय झालं?

सध्या सगळीकडे 'छावा' सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना सिनेमाला मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...

विकी कौशलच्या छावाला मोठा फटका! अडीच तासांचा सिनेमा... नेमकं काय झालं?
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याला दहा कोटी रुपयांचं मानधन मिळाल्याचं कळतंय. चित्रपटातील इतर कलाकारांच्या तुलनेत ही खूप मोठी रक्कम आहे.
Image Credit source: Youtube
| Edited By: | Updated on: Feb 18, 2025 | 6:12 PM

छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अवघ्या तीन दिवसात या चित्रपटाने १२१ कोटी रूपयांचा पल्ला पार केला आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता या चित्रपटाला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. नेमका कसला फटका बसला चला जाणून घेऊया…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाला फायरसीचा फटका बसला आहे. २ तास ३५ मिनिटांचा हा सिनेमा बेकायदेशीर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाला बॉक्स ऑफिसावर पायरसीमुळे फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

चित्रपटाच्या कमाईविषयी

‘छावा’ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट २०२५ या वर्षांतील सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३३.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली असून ती ३९.३० कोटी रूपयांवर पोहोचली. त्यानंतर रविवारी म्हणजेच १६ फेब्रुवारी रोजी या चित्रपटाच्या कमाईत बक्कळ वाढ झाली. चित्रपटाने ४९.०३ कोटी रूपयांचा गल्ला जमावला. पहिल्या तीन दिवसात सिनेमाने जवळपास १२१.४३ कोटी रूपयांची कमाई केली. पण आता पायरसीमुळे प्रेक्षक चित्रपटाकडे पाठ फिरवणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

छावा सिनेमाविषयी

‘छावा’ सिनेमाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. या चित्रपटात विकी आणि मंदानासोबतच अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, डायना पेंटी, विनीत कुमार सिंग हे बॉलिवूडमधील कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच या चित्रपटात मराठी कलाकारांची देखील फौज पाहायला मिळत आहे. चित्रपटात संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, आशिष पाथोडे, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी आणि नीलकांती पाटेकर हे कलाकार दिसत आहेत.