विकी कौशलच्या ‘त्या’ वागण्यामुळे भडकली कतरिना, थेट लग्नच कॅन्सल करण्याची दिली धमकी
नामवंत अभिनेत्यांपैकी एक असलेला विकी कौशल हा 'सॅम बहादूर' या त्याच्या आगामी चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त विविध विषयांवर बोलतानाच विकी कौशल कधीकधी त्याच्या पर्सनल लाइफबद्दलही सांगत असतो. त्याचदरम्यान त्याने एक मोठा खुलासा केला, जे ऐकून चाहतेही अवाक् झाले.

मुंबई | 24 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडच्या नामवंत अभिनेत्यांपैकी एक असलेला विकी कौशल हा ‘सॅम बहादूर’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची असंख्य चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. प्रमोशननिमित्त विविध विषयांवर बोलतानाच विकी कौशल कधीकधी त्याच्या पर्सनल लाइफबद्दलही सांगत असतो. त्याचदरम्यान त्याने एक मोठा खुलासा केला, जे ऐकून चाहतेही अवाक् झाले
विकी कौशल-आणि कतरिना कैफचे दोन वर्षांपूर्वी थाटामाटात लग्न झाले. सोशल मीडियावरही ते खूप गाजलं. मात्र एकवेळ अशी आली होती, की त्यांचं हे लग्नच कॅन्सल झालं असतं. भडकलेल्या कतरिनानेच विकीला ती धमकी दिली होती. विकीनेच याबद्दल नुकताच खुलासा केला.
लग्न की शूटिंग.. अडचणीत सापडला विकी
झालं असं की विकी हा त्याच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता. मात्र त्या शूटिंगच्या डेट्स लग्नादरम्यानही येत होत्या. लग्नासाठी त्याने काही दिवस सुट्टी तर घेतली. पण लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांतच शूटिंगसाठी परत ये, असं त्याला निर्माते आणि दिग्दर्शकांकडून सांगण्यात आलं. मात्र हे ऐकल्यावर कतरिना चांगलीच संतापली. लग्नाच्या दोन दिवसांतच तुला कामावर परतायचं असेल तर मग.. कतरिनने त्याला धमकीच दिली. ‘मी माझ्या लग्नापूर्वी चित्रपटाचे अर्धे शूटिंग केले होते आणि त्यानंतर मी सुट्टी घेतली होती. लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांनी चित्रपट निर्माते मला सेटवर बोलवत होते. पण दोन दिवसात सेटवर जायचं असेल तर मग हे लग्न तू विसर, लग्न राहू दे (कॅन्सल)’ अशी धमकी कतरिनाकडून मिळाली होती, असे विकीने हसतहसत नमूद केलं. प्रकरण जरा जास्तच सीरियस दिसतंय, थेट लग्न कॅन्सल करण्यापर्यंत ती आल्यावर मात्र विकीने लगेचच नकार कळवला आणि मग लग्नानंतर पाच दिवसांनी तो शूटिंगवर परत गेला. हसतहसत विकीने ही आठवण शेअर केली.
ती खूप प्रेमळ आहे
कतरिनाशी लग्न केल्यानंतर आयुष्य कसं बदललं याबद्दलही विकी आवर्जून बोलला. ‘स्वतःसाठी जोडीदार शोधून लग्न करणे खरोखरच चांगले आहे. लग्नानंतर घरी येण्याची ओढ लागते, तो अनुभव मस्त असतो. कतरिना खूप प्रेमळ, क्यूट आहे. तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे.’ असंही विकीने नमूद केलं.
आम्ही दोघ एकाच इंडस्ट्रीमधले असलो तरी आम्ही कामाबाबत जास्त चर्चा करत नाही, असंही विकी म्हणाला. स्क्रिप्ट किंवा अजून गोष्टींबाबत, कामाबद्दल आम्ही फारसं बोलत नाही, अस त्याने सांगितलं.
या दिवशी रिलीज होणार सॅम बहादूर
कामाबद्दल बोलायचं झालं तर विकी कौशल लवकरच ‘सॅम बहादूर’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात विकीसोबत फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, मोहम्मद झीशान अय्युब यांच्यासह अनेक स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.