AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कतरिना आणि विकी कौशलच्या खासगी आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट उघड; विकी म्हणाला…

Bad Newz Trailer Launch : 'बॅड न्यूज' या चित्रपटाचा ट्रेलर 28 जून रोजी लाँच झाला. या चित्रपटात विकी कौशल, तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी, विकी कौशलला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही प्रश्न देखील विचारण्यात आले, त्यावर अभिनेत्याने दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा आहे. काय म्हणाला विकी कौशल ?

कतरिना आणि विकी कौशलच्या खासगी आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट उघड; विकी म्हणाला...
Image Credit source: social media
| Updated on: Jun 29, 2024 | 10:32 AM
Share

अभिनेता विकी कौशलसाठी हे वर्ष एकंदरच खूप चांगल गेलंय. सॅम माणेकशॉ चित्रपटातील त्याचा कामाचं खूप कौतुक झालं. गेल्या अनेक वर्षांपासून त्याचं अभिनयाचं नाणं खणखणीत वाजत असून त्याच्या हातात छावा, संजय लीली भन्साळी यांचा आगामी चित्रपट यासह अनेक महत्वपूर्ण प्रोजेक्ट्स आहेत. तो रोमँटिक कॉमेडी चित्रपटातही तितंकच उत्तम काम करतो. आणि असाच एक चित्रपट तो प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन येत आहे. त्याच्या आगामी ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाचा ट्रेलर 28 जून रोजी लाँच झाला. या चित्रपटात विकी कौशल याच्यासह, तृप्ती डिमरी हिचीदेखील प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरदरम्यान विकी कौशल वैयक्तिक आयुष्याबद्दल काही प्रश्न देखील विचारण्यात आले. त्यावर अभिनेत्याने दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा आहे.

खरंतर ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला तेव्हा काही पत्रकारांनी विकीला त्याची पत्नी आणि अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या प्रेग्नन्सीबद्दल प्रश्न विचारला. त्याच्या उत्तराने पॅप्सची बोलतीच बंद झाली. विकी-कतरिनाच्या लग्नाला ता जवळपास तीन वर्ष होत आली आहेत. कतरिना कैफ ही गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. विकी-कतरिना लंडनमध्ये फिरत असताना या दोघांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळी तिची चाल, तिचे कपडे यावरून चाहत्यांनी अनेक तर्क वितर्क व्यक्त केले. कतरिनाच्या प्रेग्नन्सीबद्दल विकीला पहिल्यांदाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने स्पष्ट उत्तर दिले.

खरी गुड न्यूज कधी देणार ?

‘बॅड न्यूज’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी, पत्रकारांनी विकी कौशलला विचारले की , खरी गुड न्यूज कधी येणार ? तो प्रश्न ऐकून इतर कलाकारांसह विकी कौशलही हसू लागला.त्यानंतर तो म्हणाला, ‘जेव्हा (ती गुड न्यूज) येईल तेव्हा मी तुम्हा सर्वांना सांगेन, पण सध्या तरी आम्ही आणत असलेल्या या ‘बॅड न्यूज’ (चित्रपटाचा) तुम्ही आनंद घ्या. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सर्वांना नक्कीच सांगेन.’असे विकीने स्पष्ट केले. ‘बॅड न्यूज’च्या ट्रेलर लाँचला या चित्रपटाशी संबंधित प्रत्येकजण उपस्थित होता. पण कार्यक्रमादरम्यान, मीडियाने विकी कौशलला खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून सर्वच हसू लागले.

कधी रिलीज होणार ‘बॅड न्यूज’?

‘बॅड न्यूज’ या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली झाली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे. आनंद तिवारी हा एक अभिनेताही असून आता दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. बॅड न्यूज हा चित्रपट 19 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर सर्वांनाच आवडला आहे. या चित्रपटात विकी कौशलशिवाय तृप्ती डिमरी आणि एमी विर्क हे दोघेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.