तीच पर्सनॅलिटी, तीच हेअरस्टाईल; ऋषी कपूर यांच्यासारखा हुबेहूब दिसणार तरुण; व्हिडीओ पाहून नेटकरीही हैराण
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील तरुण हुबेहूब ऋषी कपूर यांच्यासारखा दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

असे अनेक कलाकार आहेत जे हुबेहूब बॉलिवूड स्टारसारखे दिसतात. खऱ्या सेलिब्रिटींमध्ये आणि त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या त्या कलाकारांमध्ये ओळख पटणं थोडं कठीण होतं. अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा तरुण हुबेहूब अभिनेते ऋषी कपूर यांच्यासारखाच दिसत आहे. या तरुणाकडे पाहिले असता ऋषी कपूर यांच्यासारखीच पर्सनॅलिटी, तीच हेअरस्टाईल अगदी हुबेहूब वाटत आहे.
हुबेहूब ऋषी कपूरच
ऋषी कपूर यांच्या डुप्लिकेट व्यक्तीचे नाव नितांत सेठ आहे, जो लखनऊचा रहिवासी आहे. तो ऋषी कपूर यांच्यासारखा दिसतो. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गेलात तर तुम्हाला तो ऋषी कपूर यांच्या गाण्यांवर नाचताना आणि अभिनय करताना दिसेल. आता या व्हिडिओमध्ये, अभिनेत्याच्या व्हिडीओने नेटकऱ्यांना ऋषी कपूर यांच्या 90 च्या दशकाची आठवण करून दिली आहे.
ऋषी कपूर यांचा डुप्लिकेट
या व्हिडिओमध्ये नितांत ऋषी कपूर यांच्या ‘साजन की बाहों में’ चित्रपटातील ‘सच्ची कहो हमसे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या डुप्लिकेटने ऋषी कपूर यांच्यासारखाच स्वेटर टीशर्ट घातला आहे आणि त्यांच्यासारखाच डोळ्यावर चष्मा आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, नितांतने लिहिले आहे की, ‘ऋषी कपूरच्या 90 च्या दशकातील काळाची आठवण करून देण्याचा माझा छोटासा प्रयत्न’. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे. आणि कमेंट करत नितांतचं कौतुक तर ऋषी कपूर यांची आठवण काढली आहे.
View this post on Instagram
नेटकरीही हैराण झाले
ऋषी कपूर यांच्यासारख्या दिसणाऱ्या या डान्स व्हिडिओवर एका युजरने लिहिले आहे की, ‘वाह, देवाने तुम्हाला दुसरा ऋषी कपूर बनवलं आहे, तुम्हाला यश मिळो’. दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘दादा, तुम्ही ऋषी कपूरसारखे दिसता’. तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘असे दिसते की आमचे ऋषी सर परत आले आहेत’. चौथ्या युजरने लिहिले आहे की, ‘क्षणभर मला विश्वास बसला होता की हे ऋषी कपूर आहेत’. तर अजून एका युजरने लिहिले आहे की, ‘तो पूर्णपणे ऋषी कपूर यांच्यासारखाच दिसत आहे’. युजर्सच्या कमेंट वाचल्यानंतर, नितांत याने आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत.
