
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून सचिन पिळगावकर ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सचिन पिळगावकर हे त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. सध्या सोशल मीडियावर महागुरुंचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते बाथरुममधील नळ बंद करण्याबाबत बोलताना दिसत आहेत. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया…
सोशल मीडियावर सचिन पिळगावकर यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण ही मुलाखत नेमकी कुठली आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मुलाखतीत सचिन पिळगावकर आंघोळ करताना आलेला अनुभव सांगताना दिसत आहेत. ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ या फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हणाले?
व्हिडीओमध्ये सचिन पिळगावकर म्हणतात, मी थंड पाण्याने आंघोळ करणारा माणूस आहे. त्यासाठी नळ सुरू करावा लागतो. मी बादली भरायला लावली. बादली भरताना वाटत पाहावी लागते. बादली भरल्यानंतर मी नळ बंद करण्याचा प्रयत्न करत होतो. पण नळ बंदच होत नव्हता. मी पॅनिक झालो. मग माझ्या लक्षात आलं की मी उलट्या दिशेने नळ बंद करतोय… नळ बंद होऊ शकणार नाही.. ते मला सुटल्या दिशेने बंद करायला हवा.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
सध्या सोशल मीडियावर सचिन पिळगावकर यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका यूजरने बादली भरत असताना वाट पहावी लागते आणि नळ बंद होत नसल्यास कृपया पॅनिक होऊ नये. तेव्हा नळ कसा बंद करायचा हा मुद्दा आहे अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, महागुरू सध्याच्या पावसाळ्याची चावी सुद्धा कदाचित तुम्ही उलट्या दिशेने फिरवत आहात म्हणून नोव्हेंबर महिना लागला तरी पाऊस जात नाही अले म्हटले आहे.