मी मुलं जन्म घालणारी मशीन नाही…, विद्या बालनचं धक्कादायक वक्तव्य

Vidya Balan on Marriage Life: मी मुलं जन्म घालणारी मशीन नाही..., विद्या बालन हिच्या लग्नाला जवळपास 13 वर्ष झाली आहेत, अभिनेत्री का नाही झाली आई? सध्या सर्वत्र विद्या बालन हिच्या वक्तव्याची चर्चा...

मी मुलं जन्म घालणारी मशीन नाही..., विद्या बालनचं धक्कादायक वक्तव्य
फाईल फोटो
| Updated on: Jun 15, 2025 | 11:23 AM

लग्न झाल्यानंतर प्रत्येक महिलेला एकच प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे पुढची प्लॅनिंग काय? यावर विद्या बालन हिने मोठं वक्तव्य केलं आहे. विद्या बालन हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2012 मध्ये स्वतःपेक्षा 4 वर्ष मोठे निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासोबत लग्न केलं. एका जुन्या मुलाखतीत विद्या बालन हिने लग्नानंतर मुलांबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. तेव्हा विद्या 30 वर्षांची होती.

विद्या बालन म्हणाली होती, ‘आता माझ्यासोबत बोलताना आधी माझं पोट पाहिलं जातं. प्रेग्नेंसीच्या अफवांमुळे तर मी आता त्रस्त झाली आहे. मी मुलं जन्माला घालेल पण इतक्या लवकर नाही. आई होण्यासाठी माझी मानसिक तयारी नाही. कोणत्या दुसऱ्या व्यक्तीची जबाबदारी घेण सहज सोपं नाही…’

‘मी 30 वर्षांची आहे पण आई होण्याच्या होण्याच्या वयाशी मला काही घेणं देणं नाही. ही एक अशी अडचण आहे, ज्याचा सामना वर्किंग वूमन करत असते. मला माझे मित्र सांगत असतात सकाळी उठायचं, मुलांना बघायचं, त्यांची अंघोळ… एक चांगला अनुभव आहे. पण फार थकायला होतं. त्यामुळे दुसऱ्या कामासाठी फार कमी ऊर्जा राहते. मी अद्याप मुलं जन्माला घालण्याच्या मानसिकेत नाही. त्यमुळे मला थोडा वेळ द्या.’ असं देखील विद्या म्हणाली.

मी दर महिन्याला प्रग्नेंट राहात होती – विद्या बालन

विद्या म्हणाली, ‘लोकं मला मोफत सल्ला द्यायचे. लग्नानंतर तुम्हाला बाळाला जन्म द्यायला हवा. एक वेळ अशी देखील होती जेव्हा मी दर महिन्याला प्रग्नेंट राहात होती. माझे फोटो क्लिक केले जायचे आणि मला विचारायचे बेबी बम्प आहे का? मी उत्तर द्यायची नाही माझं पोट आहे. लोकांनी लग्न आणि मुलांबद्दल प्रश्न विचारणं बंद केलं पाहिजे.’ असं देखील विद्या बालन म्हणाली.

विद्या बालन हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री आता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. विद्या कायम विनोदी अंदाजातील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. सोशल मीडियावर विद्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.