
अभिनेत्री विद्या बालन आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसते. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर विद्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. विद्या आता प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत नसली तरी, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना विद्या बालन हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबत नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्रीने 14 डिसेंबर 2012 मध्ये निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर याच्यासोबत लग्न केलं.
विद्या बालन हिच्या लग्नाला जवळपास 13 वर्ष झाली आहे. पण अद्याप अभिनेत्री आई झालेली नाही. अशात मुलाखतीत विद्या हिने लग्नानंतर सतत मिळत सल्ल्यांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. विद्या बालन हिचं लग्न वयाच्या 33 व्या वर्षी झालं. लग्नानंतर लोकं अभिनेत्रीला विचारायची लग्नानंतर काय प्लानिंग आहे.
विद्या म्हणाली, ‘लोकं मला मोफत सल्ला द्यायचे. लग्नानंतर तुम्हाला बाळाला जन्म द्यायला हवा. एक वेळ अशी देखील होती जेव्हा मी दर महिन्याला प्रग्नेंट राहात होती. माझे फोटो क्लिक केले जायचे आणि मला विचारायचे बेबी बम्प आहे का? मी उत्तर द्यायची नाही माझं पोट आहे. लोकांनी लग्न आणि मुलांबद्दल प्रश्न विचारणं बंद केलं पाहिजे. जेव्हा तुमचं लग्न होतं, तेव्हा लोकं तुम्हाला कायम विचारतात तुम्ही मुलांना जन्म कधी देणार…’ असं देखील विद्या म्हणाली.
‘तुमच्या वैवाहित आयुष्यात कोणतीही अडचण आली की त्याचं समाधान बाळ असले. लग्न, मुलं किंवा कुटुंब कोणत्या मुलीच्या आयुष्यातील समस्यांचं समाधान असू शकत नाही…’ असं देखील विद्या म्हणाली. विद्या कायम तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असते.
विद्या बालन हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री आता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. विद्या कायम विनोदी अंदाजातील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. सोशल मीडियावर विद्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.