मरता मरता वाचलोय…, तुरुंगात प्रसिद्ध दिग्दर्शकाची दुर्दशा… मिथुन दा, संजूबाबाने एक फोन फिरवला आणि…

प्रसिद्ध दिग्दर्शकाने गंभीर आरोपांखाली तब्बल 70 दिवसांचा तुरुंगवास भोगला... अखेर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी तुरुंगात घालवलेल्या दिवसांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय मिथुन दा, संजूबाबा यांनी केलेल्या एका फोन कॉलबद्दल देखील मोठा खुलासा केलाय...

मरता मरता वाचलोय..., तुरुंगात प्रसिद्ध दिग्दर्शकाची दुर्दशा... मिथुन दा, संजूबाबाने एक फोन फिरवला आणि...
| Updated on: Jun 07, 2026 | 8:41 AM

आयव्हीएफचे संस्थापक अजय मुर्डिया यांच्या पत्नी इंदिरा मुर्डिया यांच्यावरील बायोपिकच्या वादाप्रकरणी अटक झाल्यानंतर दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना 70 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला. विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नी श्वेतांबरी यांच्यावर 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप होता. तुरुंगात घालवलेले दिवस विक्रम भट्ट यांच्यासाठी फार कठीण होते. यावर विक्रम यांनी मोठा खुलासा केला आहे. विक्रम भट्ट यांनी तुरुंगात निर्माण झालेल्या नात्यांविषयी, त्यांच्या गंभीर आरोग्य समस्यांविषयी आणि त्यांच्या सिनेमांचे प्रेक्षक असलेल्या सामान्य भारतीयांकडून मिळलेल्या अनुभवाविषयी बोलतात. कठीण परिस्थितीत तुरुंगातील इतर कैद्यांकडून विक्रम यांना प्रेम आणि समर्थन मिळालं.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विक्रम भट्ट यांनी तुरुंगातील दिवसांबद्दल सांगितलं आहे. ‘मी 60 – 80 लोकांसोबत एकाच बरॅकमध्ये राहत होतो. पण त्याठिकाणी मी एक वेगळा भारत पाहिला आहे. खरी मैत्री काय आणि कशी असते, हे मला तुरुंगात कळलं आहे… ते मला काहीच करुन देत नव्हते. माझ्यासाठी जेवण आणायचे, माझ्या कपड्यांवर लक्ष ठेवायचे. तुरुंगातील इतर कैदी मला भिष्म पितामहा म्हणायचे. ते म्हणायचे, ‘याठिकाणी बसा आणि आम्ही भयानक गोष्टी सांगा.’ प्रत्येक रात्री 60 – 65 कैदी एकत्र यायचे आणि माझ्या गोष्टी ऐकत बसायचेय’

विक्रम भट्ट यांना तुरुंगात मिळाली मदत

विक्रम भट्ट तुरुंगात मिळालेल्या मदतीबद्दल म्हणाले, ‘मी आजारी असतानाही, पोलीस आणि तुरुंग अधिकाऱ्यांनी मला प्रचंड पाठिंबा दिला. ज्यांच्याकडून दयाळूपणाची अजिबात अपेक्षा नसते, तेच लोक सर्वात दयाळू निघाले. तिथे मला आयुष्यभरासाठीचे मित्र मिळाले, कारण त्यांनी माझ्या संरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. माझ्या दोन्ही बाजूंना दोन जण झोपायचे. त्यामुळे कोणीही मला इजा करू शकत नव्हते.’ असं देखील विक्रम भट्ट म्हणाले.

सुटका झाल्यानंतर मिथुन दा आणि संसूबाबाचा आलेला फोन

विक्रम भट्ट म्हणाले, ‘मिथुन दा यांनी मला फोन केलेला. अन्य लोकांनी देखील मला फोन केले… संजय दत्त याने देखील फोन करून माझी विचारपूस केली. मी तर त्यांच्यासोबत एकाही सिनेमात काम केलं नव्हतं, तरी देखील त्यांनी फोन करुन माझी विचारणा केली. त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो.’

‘अजय देवगणने देखील फोन केला कारण तो माझा बालपणीचा मित्र आहे. प्रत्येक नातं वेगळं असतं. तुम्ही सगळ्यांवर अशा अपेक्षा कशा लादू शकत नाही. असं देखील विक्रम भट्ट म्हणाले.

Follow Us