Shah Rukh Khan : भर कार्यक्रमात विक्रांत मेसीने शाहरुख खानसोबत असं काही केलं, की किंग खानही पाहतच राहिला!
भर कार्यक्रमात अभिनेता विक्रांत मेस्सीने चक्क स्टेजवरचं शाहरूख खानसोबत असं काही केलं आहे, की शाहरूखची काही वेळ शांत राहून पाहत बसला विक्रांतची ही कृती पाहून शाहरूखने अशी काही प्रतिक्रिया दिली की जमलेले प्रेक्षक स्तब्ध होऊन बघतच राहिले, शाहरूखने असं काय केलं वाचा,

बॉलिवूडमध्ये एखादा मोठा कार्यक्रम असला की कलाकारांचे लूक, त्यांची एंट्री आणि त्यांचे फोटो यांची चर्चा होते. पण यावेळी एका छोट्या कृतीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेता विक्रांत मेस्सीने चक्क स्टेजवरचं शाहरूख खानची पँट ठीक केली. विक्रांतची ही कृती पाहून शाहरूखने अशी काही प्रतिक्रिया दिली की जमलेले प्रेक्षक स्तब्ध होऊन बघतच राहिले, शाहरूखने असं काय केलं वाचा,
21 नोव्हेंबर रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे ग्लोबल पीस ऑनर्स 2026 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं अँकरिंह अभिनेता विक्रांत मेस्सी करत होता. यावेळी शाहरूखस खान,विक्रांत मेसी आणि बोमन इराणी एकाच मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान बोमन इराणी यांनी शाहरूख खान आणि विक्रांत मेस्सीला मंचावर बोलावलं. त्यावेळी विक्रांतंच लक्ष शाहरूखच्या पँटकडे गेलं. शाहरूखच्या डाव्या पायातील बूटाजवळ पँटचा कपडा अडकला होता. हे पाहताच विक्रांत खाली वाकला आणि त्याने शाहरूखची पँट व्यवस्थित केली.
&
nbsp;
विक्रांतची ही कृती पाहून शाहरूखही हसला, विक्रांत उभा राहताच शाहरूखने त्याला एका हाताने मीठी मारली आणि पाठीवर थाप देखील दिली. मंचावर उपस्थित असलेले बोमन इराणीही हा प्रसंग पाहून हसताना दिसले, या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडीयावल व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमातील शाहरूख खानचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये शाहरूख विक्रांत मेस्सी आणि बोमन इराणी यांना त्याची सिग्नेचर पोज शिकवताना दिसत आहे. तिघांनीही मंचावर एकत्र ही पोझ दिली.
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात शाहरुख आणि विक्रांत यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. शाहरुखला ‘जवान’साठी, तर विक्रांतला ‘१२th फेल’साठी हा पुरस्कार मिळाला. इतकेच नाही, तर विक्रांतचा २०२२ मधील चित्रपट ‘लव्ह हॉस्टेल’ हा शाहरुखच्या प्रोडक्शन हाऊस, रेड चिलीज एंटरटेनमेंटने निर्मित केला होता.
दरम्यान याच कार्यक्रमात शाहरूख खानने 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला आणि पहलगाम दहशतवादी हल्लातील शहीद आणि पीडितांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमतील विक्रांत आणि शाहरूख यांच्यातील हा छोटासा प्रसंग मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.