
या अभिनेत्याने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. अनेक शोमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले. आता तो चित्रपटसृष्टीत मोठे नाव बनला आहे. एका कमी बजेटच्या चित्रपटाने त्याच्या करिअरला सुरुवात झाली. आम्ही ज्या व्यक्तीविषयी बोलत आहोत त्या अभिनेत्याचे नाव विक्रांत मेसी आहे

विक्रांतला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. तो सुरुवातीला रणवीर सिंगच्या 'लुटेरा' आणि 'दिल धडकने' सारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमध्ये दिसला. आपल्या टॅलेंटच्या जोरावर त्याने बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

फार कमी लोकांना माहित असेल की विक्रांतने 2007 मध्ये टीव्हीवरून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने 'धूम मचाओ धूम'मध्ये आमिर हसनची भूमिका साकारली होती. यानंतर तो 'बालिका वधू' आणि 'धरम वीर' सारख्या शोमधून प्रसिद्ध झाला.

टीव्हीवर त्याचं काम चांगलं चाललं होतं, पण त्याला बॉलिवूडमध्ये आपलं कौशल्य दाखवायचं होतं. त्याने अनेक अडचणींचा सामना करत बॉलिवूडमध्ये स्थान मिळवले.

विक्रांतचे वडील ख्रिश्चन असून आई शीख धर्माची आहे. त्याच्या मोठ्या भावाने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तर विक्रांत मेसीची पत्नी शीतल ठाकूर हिंदू आहे. 'अनफिल्टर्ड बाय समदीश' पॉडकास्टवर विक्रांतने सांगितले की, मोठे होत असताना त्याने धर्मावर सर्व प्रकारच्या चर्चा आणि वादविवाद पाहिले आहेत.