AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘साडी के फॉल सा’ गाण्यावर विराट कोहलीचा सोनाक्षी सिन्हासोबत जबरदस्त डान्स, पहा Video

विराटचा हा व्हिडीओ जुना असून त्यात तो अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत ठेका धरताना दिसतोय. हा व्हिडीओ 2016 मधील असल्याचं म्हटलं जात आहे. क्रिकेटर रोहित शर्माच्या लग्नात सोनाक्षी आणि विराटने एकत्र डान्स केला होता.

'साडी के फॉल सा' गाण्यावर विराट कोहलीचा सोनाक्षी सिन्हासोबत जबरदस्त डान्स, पहा Video
रोहित शर्माच्या लग्नात विराट-सोनाक्षीचा डान्सImage Credit source: Twitter
| Updated on: Feb 24, 2023 | 12:42 PM
Share

मुंबई : आपल्या आवडत्या क्रिकेटरला मैदानातील जबरदस्त खेळीनंतर नाचताना, गाताना पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असते. हाच डान्स जर बॉलिवूड सेलिब्रिटीसोबत असेल, तर मग त्याची मजा काही औरच असते. टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीच्या डान्सचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटचा हा व्हिडीओ जुना असून त्यात तो अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत ठेका धरताना दिसतोय. हा व्हिडीओ 2016 मधील असल्याचं म्हटलं जात आहे. क्रिकेटर रोहित शर्माच्या लग्नात सोनाक्षी आणि विराटने एकत्र डान्स केला होता.

सोनाक्षीच्या आर. राजकुमार या चित्रपटातील ‘साडी के फॉल सा’ हे गाणं त्यावेळी तुफान गाजलं होतं. त्याच गाण्यावर सोनाक्षीसोबत विराटने जबरदस्त डान्स केला. या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. विराटच्या डान्सचे व्हिडीओ याआधीही सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हायरल झाले होते. मैदानातील खेळीशिवाय त्याला अशा अंदाजात पाहणं चाहत्यांना खूप आवडतं.

पहा व्हिडीओ-

विराट आणि सोनाक्षीच्या या व्हिडीओला 56 हजारांहून अधिक व्हूज मिळाले आहेत. रोहित शर्माच्या लग्नाचं रिसेप्शन मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं. या रिसेप्शन पार्टीला क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. रोहितने रितिका सजदेहशी लग्न केलं आणि या दोघांना आता चार वर्षांनी समायरा ही मुलगी आहे.

आर. राजकुमार या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाने अभिनेता शाहिद कपूरसोबत काम केलं होतं. या चित्रपटातील ‘साडी के फॉल सा’ हे गाणं त्यावेळी तुफान हिट ठरलं होतं.

काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांचा ‘पठाण’ गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर शाहरुख खाननेही प्रतिक्रिया दिली होती.

शाहरुखने लिहिलं होतं, ‘ते माझ्यापेक्षाही चांगला डान्स करत आहेत. मलाच विराट आणि जडेजाकडून शिकावं लागेल.’ विराट आणि जडेजाचा हा डान्स व्हिडीओ भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या गेलेल्या टेस्ट मॅचदरम्यानचा होता. मॅचच्या ब्रेकदरम्यान विराट आणि जडेजाने हा डान्स केला होता आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला होता.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल