AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anushka Sakshi Friendship | अनुष्का शर्मा आणि धोनीची पत्नी साक्षी ‘या’ आहेत बालपणीच्या खास मैत्रिणी, शाळेतील दोघींचे फोटो व्हायरल

विराट कोहली याची पत्नी आणि बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा ही मुंबईच्या रस्त्यावर गाडीवर फिरताना दिसली होती.

Anushka Sakshi Friendship | अनुष्का शर्मा आणि धोनीची पत्नी साक्षी 'या' आहेत बालपणीच्या खास मैत्रिणी, शाळेतील दोघींचे फोटो व्हायरल
| Updated on: May 30, 2023 | 9:03 PM
Share

मुंबई : कालच आयपीएलचे फायनल झाले. या सामन्यात चेन्नईने गुजरातला हरवले. अजूनही प्रेक्षकांमध्ये या मॅचबद्दलची चर्चा दिसत आहे. या मॅचमध्ये महेंद्र सिंह धोनीची (MS Dhoni) पत्नी साक्षी  स्टेडियमवर उपस्थित होती. नेहमीच क्रिकेटरच्या पत्नी त्यांना सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहचतात. विराट कोहली (Virat Kohli) याची पत्नी आणि बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही देखील कायमच विराट कोहली याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये दिसते. मात्र, तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, अनुष्का शर्मा आणि साक्षी सिंह या लहानपणीपासूनच्या मैत्रिणी आहेत. इतकेच नाही तर एकाच शाळेत त्यांचे शिक्षण (Education) देखील झाले आहे.

सध्या सोशल मीडियावर अनुष्का शर्मा आणि साक्षी यांचे जुने काही फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये अनुष्का शर्मा आणि साक्षी या दिसत आहेत. या फोटोवरून हे स्पष्ट दिसत आहे की, हे फोटो फार जुने नक्कीच आहेत. यातील एका फोटोमध्ये तर अनुष्का शर्मा आणि साक्षी या फार लहान दिसत आहेत.

Anushka Sakshi

अनुष्का शर्माचे वडील निवृत्त कर्नल अजय कुमार शर्मा हे आसाममध्ये तैनात असताना त्यांनी अनुष्का शर्मा हिला सेंट मेरी स्कूलमध्ये टाकले होते. विशेष म्हणजे याच शाळेत साक्षी देखील होती. जो एक फोटो व्हायरल होत आहे तो याच शाळेतील साक्षी आणि अनुष्का यांचा आहे. 2008 मध्ये अनुष्का शर्मा हिने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.

शाहरूख खान याच्यासोबत पहिल्याच चित्रपटात काम करण्याची संधी ही अनुष्का शर्मा हिला मिळाली. रब ने बना दी जोडी या चित्रपटानंतर अनुष्का शर्मा हिने अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. 2017 मध्ये अनुष्का शर्मा हिने विराट कोहली याच्यासोबत लग्न केले. मात्र, लग्नानंतर अनुष्का शर्मा ही चित्रपटांमध्ये दिसत नाहीये.

Anushka Sakshi

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची एक मुलगी देखील असून तिचे नाव वामिका ठेवले आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांची मुलीची एकही झलक ही चाहत्यांना दाखवली नाहीये. काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा ही मुंबईत गाडीवर फिरताना दिसली होती. मात्र, हेल्मेट घातले नसल्यामुळे अनुष्का शर्मा हिला दंड आकारण्यात आला. अनुष्का शर्मा हिचा तो व्हिडीओ खूप जास्त व्हायरल झाला होता.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.