AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओव्हर टेक करुन गेला.. मी काच खाली केली आणि…; विशाखा सुभेदारने सांगितला गाडी चालवताना अनुभव

महिला दिनानिमित्त अभिनेत्री विशाला सुभेदारने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने गाडी चालवतानाचा अनुभव सांगितला आहे.

ओव्हर टेक करुन गेला.. मी काच खाली केली आणि...; विशाखा सुभेदारने सांगितला गाडी चालवताना अनुभव
Vishakha SubhedarImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 08, 2025 | 5:46 PM
Share

आज जगभरात महिला दिन हा मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. अनेकजण सोशल मीडियावर महिलांसाठी खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा देताना दिसत आहेत. यामध्ये कलाकारांचा देखील समावेश आहे. दरम्यान, अभिनेत्री विशाखा सुभेदारने शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओमध्ये तिने गाडी चालवतानाचा अनुभव सांगितला आहे. हा अनुभव ऐकून सर्वजण चकीत झाले आहेत.

विशाखाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘विशाखा के विचार’ असे म्हणत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये विशाखा गाडी चालवताना दिसत आहे. गाडी चालवत असताना विशाखाने आधी गाडी चालवतानाचा अनुभव सांगितला आहे. ‘लेडी ड्रायव्हर म्हटल्यावर लोक फार हलक्यात घेतात. तसेच त्यांचा अहंकारही दुखावला जातो. ही काय मला क्रॉस करणार? असे त्यांना वाटत असते. एकदा मी शूटिंगला जात होते. माझ्यामागे एक स्कॉर्पिओ गाडी होती. माझी नॅनो गाडी. माझ्या नॅनोने स्कॉर्पिओला ओव्हरटेक केलं. त्यात महिला ड्रायव्हर आहे म्हटल्यावर त्याचा (स्कॉर्पिओ चालकराचा) अहंकार इतका दुखावला गेला की तो ओव्हरटेक करुन, कट मारून मला पुढे गेला’ असे विशाखा म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘तो पुढे जाऊन जिंकल्यासारख्या अविर्भावात एका सिग्नलला जाऊन थांबला. मी पुढे जाऊन काच खाली केली आणि त्याला म्हटलं की मला थोडं बोलायचं आहे. मी म्हटलं अरे तुम्ही अजून इथेच आहात. मला वाटलं तुम्ही आयच्या गावात पोहोचले असाल.’

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट

हा व्हिडीओ शेअर करत विशाखाने, “Steering wheel समोर बसणं हे passion आणि जबाबदारीचं काम आहे. ते आपण स्त्रिया नक्कीच करू शकतो! चलाते राहो, आगे बढते राहो.. जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा!” असे कॅप्शन दिले आहे. सोशल मीडियावर विशाखाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने, ‘बाईपण भारी देवा!! बाईपण भारी गं!!’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘बहुतांश स्त्रिया नियमानुसारच वाहन चालवतात आणि तेच पुरुषांना जास्त खटकते.. गाडीचा रंग भन्नाट आहे’ अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने, ‘महिलांचे नेतृत्व आहे पण ते सन्मानासहित मान्य करायला हवे… महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा’ अशी कमेंट केली आहे.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.