मरणाची हसले मी..; पॅडी कांबळेसाठी विशाखा सुभेदारची भन्नाट पोस्ट, दिला फुल्ल सपोर्ट!

'बिग बॉस मराठी 5'मध्ये गेल्या 15 दिवसांत घरातील सर्व सदस्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सर्वच सदस्य एकापेक्षा एक असल्याने त्यांनी 'बिग बॉस मराठी'चं घर डोक्यावर घेतलं आहे. आता पंढरीनाथ कांबळेसाठी विशाखा सुभेदारने खास पोस्ट लिहिली आहे.

मरणाची हसले मी..; पॅडी कांबळेसाठी विशाखा सुभेदारची भन्नाट पोस्ट, दिला फुल्ल सपोर्ट!
विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 15, 2024 | 1:38 PM

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. या सिझनमध्ये पहिल्याच दिवसापासून घरात दोन गट पडले. नुकत्याच पार पडलेल्या टास्कमध्ये निक्की तांबोळीच्या टीमने बाजी मारली. मात्र या टास्कदरम्यान घरातील सदस्यांमध्ये बरेच वाद झाले. मात्र बिग बॉसच्या घरात असेही काही सदस्य होते, ज्यांनी कोणताच वाद न घालता टास्क पार पाडला. सूत्रसंचालक रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळे यांना मोकळेपणे खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार पॅडीने त्याच्या खेळात बरीच सुधारणा केली आहे. त्याच्या याच खेळीनंतर आता पॅडीची खास मैत्रीण आणि सहकलाकार विशाखा सुभेदारने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

विशाखा सुभेदारची पोस्ट-

तुझ्यातलं माणूस त्याला दिसलं असावं. म्हणूनच मैत्रीचं पाऊल त्याने उचललं. फुल सपोर्ट तुला. आता एकदा आपलं गाणं होऊन जाऊ दे.
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा!
– अरे बाबा भांडणातसुद्धा तू एकदाही चूकत नव्हतास. तुझे मुद्दे, फंडे क्लिअर होते. एक अख्खा दिवस तो तूझा खेळ होता. कुठेही चुकीचं पाऊल, वक्तव्य नाही, कोणालाही लागेल असं स्टेटमेंट नाही.
– त्या पुढारीला तू कोण? असं विचारलंस तेव्हाचं टायमिंग इतकं कमाल होतं की मरणाची हसले मी.
– निक्कीला नडणं हे परफेक्ट होतं. कारणही रास्त. तिच्यावर आवाज.. मज्जा आली. तू तूझं काम करत नव्हतीस आणि घूस त्या ड्रॉवरमध्ये… सूर मार वॉज एपिक.
– काल वर्षाताईंची नाजूक मुद्द्यावर बाजू घेतली. ताईंनी तूझा खांदा थोपटला.. #paddykamblegoodhuman.
– डीपीची साथसुद्धा, मज्जा मस्करी पिकनिक स्पॉटवर तू धमाल करत असणार. जे एक तासाच्या एपिसोडमध्ये पहायला मिळत नाही. पिकनिक बास्केटसुद्धा गाजव. हक्काने.
– दोन आठवडे थंड होतास, उमजत नव्हतं. कोण, काय, कसं याचा अंदाज घेत होतास. प्रेक्षक आणि पिकनिकचे अध्यक्ष म्हटलं रितेशभाऊ पण आता नाही. आता तर तू स्वार झालायस. मांड आता तर ठोकलीयस. शुरु झालंय गेम तुझा.
– जरी तू शांत तरी नसे तू थंड. आग हैं. आम्हाला माहित आहे जीगरा हैं!

विशाखाने याआधीही पंढरीनाथसाठी पोस्ट लिहिली होती. ‘प्प बसू नकोस. यारों का यार हैं तू, तुझ्या माणसासाठी तू उभा असतोस मदतीला, आज स्वत:साठी उभा रहा मित्रा,’ असं तिने लिहिलं होतं. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी पंढरीनाथने सांगितलं होतं, “पैसे आणि संपत्ती मिळवणं हे महत्वाचं नाही. तर मी एक चांगला माणूस म्हणून ओळखला जाणं हेच माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. या शोसाठी मी कोणतीही स्ट्रॅटेजी तयार केली नाही. कारण माझ्या मते ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कोण कसं वागेल हे सांगणं अवघड आहे. मी माझी मत मांडेन. तसंच तिथे स्टँड घेईन, चिडेन, ओरडेन, पण समजुतीने परिस्थिती हाताळीन.”